लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी १३’ लवकरच सुरू होणार आहे. या शोचे शूटिंग केप टाउनमध्ये सुरू आहे. यंदाही रोहित शेट्टी हा शो होस्ट करत आहे. तसेच यावर्षी ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे या सीझनचा पहिला फायनलिस्ट झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता या शोसंदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘खतरों के खिलाडी १३’मधून कोण-कोण स्पर्धक बाहेर झाले आहेत आणि कोणी टॉप ८ मध्ये बाजी मारली आहे, हे आता समोर आले आहे. डेजी शहानंतर आता या शोमधून ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ फेम शीझान खान बाहेर पडला आहे. शीझान हा ‘खतरों के खिलाडी १३’चा नववा स्पर्धक होता. आता टॉप ८ स्पर्धकांमध्ये अर्चना गौतम, शिव ठाकरे, अर्जित तनेजा, डीनो जेम्स, ऐश्वर्या शर्मा, सौंदस मौफकीर, नायरा बॅनर्जी आणि रश्मित कौर आहे.

हेही वाचा – ३१ वर्षांपूर्वीच्या शाहरुख खानच्या ‘त्या’ व्हिडीओची मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले, “हेल्मेट…”

हेही वाचा – इसे कहते है दोस्ती! करण जोहरसाठी वरुण धवनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सर्वात पहिल्यांदा या शोमधून रोहित रॉय बाहेर पडला होता. त्याला दुखापत झाल्यामुळे तो हा खेळ पूर्ण करू शकला नाही. त्याच्यानंतर अंजुम फकीह आणि रुही चतुर्वेदी या शोमधून बाहेर पडली होती. दरम्यान अजूनपर्यंत हा रिअॅलिटी शो प्रसारित होण्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण १५ जुलैपासून ‘खतरों के खिलाडी १३’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे.