अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर तिचा सह-कलाकार आणि बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या आठवडाभरात शिझानवर तुनिषाच्या आईने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तुनिषाच्या मृत्यूला त्यांनी शिझानला जबाबदार धरलं होतं. अशातच शिझानची आई आणि बहिणी फलक व शफाक नाज यांनी पत्रकार परिषद घेत या आरोपांना उत्तर दिलंय.

“शिझान-तुनिषाचं ब्रेकअप झालंच नाही” अभिनेत्याच्या बहिणीचा दावा; तुनिषाच्या आईवर केले गंभीर आरोप

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?

तुनिषाची आई फक्त पैशांसाठी मुलीला काम करायला लावत होती. तुनिषाला शिकायचं होतं, फिरायचं होतं, पण तिच्या आईने तिला काहीच करू दिलं नाही, असा आरोप शिझानची बहीण फलकने केलाय. तुनिषा नैराश्यात होती, पण तरीही तिची आई तिला काम करायला लावत होती. ती बऱ्याचदा आपल्याला काम करायची इच्छा नसल्याचं आम्हाला सांगत होती, पण तिची आई तिला जबरदस्ती काम करायला भाग पाडत होती, असंही फलक पत्रकार परिषदेत म्हणाली.

तुनिषा शर्मा प्रकरणात अटकेत असलेल्या शिझान खानची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “माझा…”

दरम्यान, तुनिषाचा मामा म्हणून माध्यमांसमोर येणारा पवन शर्मा हा तिचा मामा नसल्याचा दावा शिझानच्या कुटुंबाने केला आहे. तो तिचा मामा नव्हे तर तिचा मॅनेजर होता, असं त्यांनी सांगितलं. पवन शर्मा आवश्यकतेपेक्षा जास्त तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याने तुनिषाने त्याला कामावरून काढलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे. तुनिषाला आम्ही गेल्या ५ महिन्यांत खूप आनंद दिला. ती आमच्याबरोबर फिरायला यायची, ती खूप खूश होती, पण ते तिच्या आईला पाहावत नव्हतं, असंही फलकने सांगितलं. तसेच शिझान आणि तिचं ब्रेकअप झालं नव्हतं, असा दावाही तिने केला आहे.

Story img Loader