टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. २० वर्षीय अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शीझान खान पोलिसांच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे.

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शीझानच तिला रुग्णालयात घेऊन गेला होता. आत्महत्येनंतर तिला एफ अण्ड बी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेथील डॉक्टरांनी तुनिषा आत्महत्याप्रकरणात शीझानबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयातील डॉक्टर हनी मित्तल यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “२४ डिसेंबरला जवळपास ४.१० वाजता तुनिषाला शीझान व तिचे काही सहकलाकार घेऊन आले होते. काहीही करुन तुनिषाला वाचवा अशी विनंती शीझान वारंवार करत होता. हे सांगताना तो खूप रडतही होता”.

हेही वाचा>>सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, म्हणाली “पुढच्या वेळी…”

हेही वाचा>> Tunisha Sharma Case: तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शीझान खान चौकशीबाबत पोलिसांनी केले पाच मोठे खुलासे

“तुनिषाला रुग्णालयात आणलं तेव्हा तिचा मृतदेह थंड पडला होता. ईसीजी व अन्य काही रिपोर्टही केले. त्यानंतरच तिला मृत घोषित केलं गेलं”, असंही डॉ.मित्तल म्हणाले. ते पुढे म्हणाले, “शीझान खान खूप वेळ रुग्णालयात होता. आणि तो सतत रडत होता. तुनिषाला वाचवण्यासाठी विनंती करत होता. परंतु तुनिषाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हाच तिचा मृत्यू झाला होता”.

हेही वाचा>> Video: महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या रितेश देशमुख-जिनिलीयाशी दिलखुलास गप्पा

तुनिषा शर्मावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. शीझान खानची आई व बहिणही तुनिषाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते.

Story img Loader