‘पंजाबची कतरिना कैफ’ अशी ओळख करु पाहणाऱ्या, ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वात झळकलेली शहनाझ गिल उर्फ सना आज बॉलीवूडची एक ग्लॅमरस, हॉट अभिनेत्री झाली आहे. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी जान’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शहनाझच्या नावाची सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा होतेय. ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटानंतर लवकरच सर्वांची लाडकी सना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट निर्माता मुराद खेतानीच्या ‘सब फर्स्ट क्लास’मध्ये झळकणार आहे. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. कोणत्याही कलाकाराला संघर्ष चुकलेला नाही, तसाच शहनाझचा देखील होता. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्ताने तिचा आजवरचा प्रवास थोड्यात जाणून घेणार आहोत.

शहनाझ गिलचा जन्म २७ जानेवारी १९९३ रोजी चंदीगढमधील शीख कुटुंबात झाला. तिचं शालेय शिक्षण डलहौजी हिलटॉप शाळेत झालं. त्यानंतर तिनं लवली यूनिवर्सिटीमध्ये कॉमर्स शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण केलं. तिला अभिनयाची खूप आवड होती. पण घरच्यांचा अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी विरोध होता. चित्रीकरण करून घरी उशीरा येणं पटत नव्हतं. त्यामुळे घरच्यांनी शहनाझचं लग्न करायचं ठरवलं होतं. पण शहनाझला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं होतं. त्यामुळे तिनं लहान वयात घर सोडण्याचा निर्णय घेतला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचं प्राणीमय जग

फोटो सौजन्य – शहनाझ गिल इन्स्टाग्राम

२०१५ साली मॉडेलिंगच्या जगात शहनाझनं पाऊल ठेवलं. याचं वर्षी तिला ‘शिव दी किताब’ हे गाणं मिळालं. सनाचं हे गाणं सुपरहिट झालं. त्यानंतर शहनाझचा पंजाबी इंडस्ट्रीतला प्रवास जोरदार सुरू झाला. अनेक पंजाबी गाणी, अल्बम, चित्रपटात ती काम करू लागली. अभिनयाव्यतिरिक्त ती स्वतः अल्बममध्ये गाणं गाऊ लागली. पण यादरम्यान शहनाझ व मॉडेल, अभिनेत्री हिमांशी खुरानाचा वाद पेटला. दोघी एकमेकांच्या कामावर टीका करत असत. पंजाबी इंडस्ट्रीत या दोघींमधला वाद खूप काळ गाजला. पंजाबी इंडस्ट्रीने शहनाझला जितक्या लवकर स्वीकारलं तितक्या लगेच नाकारलं. तिला पंजाबी इंडस्ट्रीने तिला बाजूला सारलं. तिला स्वतः काम केलेल्या चित्रपटाच्या प्रिमिअर देखील बोलवत नसे. पण जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, यावर शहनाझचा विश्वास होता. आयुष्यात आलेला पडत्या काळात जास्त खचून न जाता तिने काम सुरू ठेवलं.

करिअरची सुरुवात केल्यानंतर काही वर्षातच शहनाझचं नशीब पालटलं. कारण होतं ‘बिग बॉस’चं १३वं पर्व. या पर्वात आलेली शहनाझ प्रेक्षकांना चांगलीच भावली. ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वात सना कुठलाही मुखवटा घालून वावरली नाही. जे तिच्या मनात होतं, ते ती तोंडावर बोलायची. एंटरटेनमेंटच्या बाबतीत या पर्वात ती नंबर वन होती. त्यामुळे ती ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाची एंटरटेनमेंट क्वीन ठरली अन् ती सेकंड रनअप झाली. याच पर्वात तिला जीवाभावाचा मित्र भेटला, तो म्हणजे दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला. शहनाझची सिद्धार्थबरोबरची मैत्री अत्यंत घनिष्ठ होती. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ‘सिडनाज’ हा हॅशटॅग सतत ट्रेंड होत. आजही ‘सिडनाज’ या नावाने अनेक सोशल मीडियावर अकाउंट आहेत. ज्यावर सिद्धार्थ-शेहनाजचे व्हिडीओ, फोटो शेअर केले जातात. कारण ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही दोघांची मैत्री टिकून होती.

हेही वाचा – ‘पांडू हवालदार’पूर्वी अशोक सराफ यांनी का घेतला होता चार वर्षांचा ब्रेक? जाणून घ्या…

फोटो सौजन्य – शहनाझ गिल इन्स्टाग्राम

‘बिग बॉस’नंतर सिद्धार्थ शहनाझची काही गाणी प्रदर्शित झाली. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. डिसेंबर २०२१मध्ये दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण त्यापूर्वीच २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थचं निधन झालं. शहनाझच्या मांडीवर सिद्धार्थने प्राण सोडल्याचं, अनेक वृत्तातून समोर आलं. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाझची झालेली अवस्था पाहून ती पुन्हा इंडस्ट्रीत येईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र शहनाझने सिद्धार्थबरोबरचं शेवटचं गाणं ‘तू ही है’ने इंडस्ट्रीत पुनरागमन केलं. असं असलं तरी ती काही मुलाखतींमध्ये सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झालेली पाहायला मिळाली. पण हे दुःख बाजूला ठेवून तिने पुन्हा नव्या जोमाने कामाला जोरदार सुरुवात केली. जाहिराती, गाणी, चित्रपटांमध्ये शहनाझ झळकू लागली. अशा या खडतर प्रवासातून सावरत बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शहनाझ उर्फ सनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Story img Loader