शहनाझ गिल अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. शहनाझ गिल बिग बॉसमुळे खूप चर्चेत आली होती. तिची बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाशी मैत्री आणि भांडण चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर दुःखी झालेली शहनाझ पाहून अनेक चाहते हळवे झाले होते. बराच काळ ती या दुःखाच्या काळातून बाहेर पडू शकली नव्हती. पण आता शहनाझने स्वत:ला सांभाळले आणि पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. आता परत तिच्याभोवती चाहत्यांच्या गर्दीत पाहायला मिळते. दरवेळी ती तिच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्यांना फोटो देते. परंतु नुकताच तिला एका चाहत्याचा फार वाईट अनुभव आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : नयनताराच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म; पण तामिळनाडू सरकारने दिले चौकशीचे आदेश, कारण…

शहनाजची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. ती जिथे जाईल तिथे तिच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतीच ती विमानतळावर दिसली आणि तिच्या चाहत्यांनी तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी रांगा लावल्या. परंतु फोटो क्लिक करताना एकाने असे कृत्य केले की, शहनाजलाही त्याला त्या कृत्याबद्दल चार शब्द ऐकवावे लागले.

शहनाजचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शहनाज गिल विमानतळावर पोहोचताना दिसली. तिला मीडिया फोटोग्राफर्सना पोज देताना पाहून लोकांनी तिला घेरले. यानंतर एकामागून एक त्याचे चाहते तिच्यासोबतचे फोटो काढू लागले. इतक्यात तिथे एक माणूस आला आणि शहनाज चुकून गिलच्या खांद्यावर तो हात ठेवणार इतक्यात शहनाजने त्याला मागे हटकले. त्यानेही शहनाजला चिडलेले पाहून स्वतःला थांबवले आणि माफी मागायला सुरुवात केली. मात्र, नंतर शहनाजने त्याला तिच्याबरोबर फोटो काढू दिला. शेवटी तो माणूस तेथून निघताना त्या माणसाकडे बघून म्हणाली, “तुला काय मी तुझी मैत्रीण वाटले?”

हेही वाचा : “एवढा अहंकार चांगला नाही…” व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी शहनाझ गिलला सुनावलं

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. यावर लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. करिना नुकताच करिना कपूरलाही चाहत्यांचा असा वाईट अनुभव आला होता. त्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया देत चाहत्यांच्या अशा कृतीचा निषेध केला.