टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्ला याचं २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झालं. सिद्धार्थचा आज वाढदिवस आहे. सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल यांची जोडी चाहत्यांच्याही प्रचंड पसंतीस उतरली होती. त्याच्या वाढदिवशी शहनाजने खास पोस्ट शेअर केली आहे.
शहनाजने सिद्धार्थचा वाढदिवस केक कापून सेलिब्रेट केला. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. याबरोबरचा शहनाजने तिचे व सिद्धार्थचे रोमॅंटिक फोटोही शेअर केले आहेत. सिद्धार्थचा फोटो पोस्ट करत शहनाजने भावूक पोस्टही लिहिली आहे. “मी तुला पुन्हा भेटेन” असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.
हेही वाचा>> “मी काश्मीरचा…” नावावरुन झालेलं चाहत्याचं कन्फ्युजन गश्मीर महाजनीने स्वत:च केलं दूर
शहनाजच्या या पोस्टवर सिद्धार्थच्या चाहत्यांनीही कमेंटद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थच्या आठवणीत अनेक जण भावूक झाले आहेत. तर काहींनी शहनाज कौतुकही केलं आहे.
हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबची आयुष्मान खुरानासाठी खास पोस्ट, म्हणाली…
सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झाले होते. ‘बिग बॉस’च्या घरातच त्यांचे प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. ते लग्नबंधनातही अडकणार होते. परंतु, त्याआधीच २ सप्टेंबर २०२१ रोजी हृद्यविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं.