बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. राखी सावंत ही तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विविध खुलासे करताना दिसत आहे. राखी सावंतने पती आदिल खान दुर्रानीविरोधात तक्रार केली होती. आदिलने मारहाण केल्याचा आरोप राखीने केला आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी राखीचा पती आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यातच आता या प्रकरणावर अभिनेत्री शर्लिन चोप्राने स्पष्टपणे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शर्लिन चोप्राने नुकतंच एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान तिने राखी सावंत-आदिल खान यांच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने थेटपणे भाष्य केले. “मला आदिल फार समजुतदार वाटतो, तो यात कसा अडकला काहीही समजत नाही”, असे शर्लिन चोप्रा यावेळी म्हणाली.
आणखी वाचा : Video : “टुट कर प्यार करे जो…” राखी सावंत भावूक, आदिलचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली “तुझ्याबरोबर घालवलेल्या क्षणांचा…”

“मला त्या दोघांबद्दल जास्त माहिती नाही, पण इतकं नक्कीच सांगू शकते की मी आदिलला पोलिस स्टेशनमध्ये भेटली आहे. तो फार समजुतदार माणूस आहे, पण का, कसा, कोण जाणे, तो यासर्व गोष्टींमध्ये अडकला. मी जेवढा वेळ त्याच्याशी बोलली आहे तेव्हा तेव्हा मला हे जाणवलंय की तो फारच समजुतदार व्यक्ती आहे. मी त्याला हे सांगितलं देखील होतं. तू मला फारच समजुतदार वाटतोस, मग तू या सर्व गोष्टीत कसा काय अडकलास, असेही मी त्याला विचारले होते”, असे शर्लिन चोप्राने म्हटले.

“जर चर्चेत राहण्यासाठी तुम्ही सतत भांडायला हवं, वाद घालायला हवा, असं काही गरजेचे नाही. तुमच्या नात्यातील गोष्टी चव्हाट्यावरही आणण्याची गरज नाही”, असा टोलाही शर्लिनने राखीला लगावला.

आणखी वाचा : “चुकीच्या मार्गाने…” राखी सावंतने पती आदिल खानकडून मागितली दीड कोटींची रक्कम

“मी आदिलला माझा भाऊ मानते आणि माझ्या भावाबद्दल या गोष्टी ऐकल्यावर मला फार वाईट वाटतंय. राखी आणि आदिलमध्ये जे काही वाद आहेत, ते लवकरात लवकर संपू दे. तसेच जर आदिल असं काही चुकीचं करत असेल, तर त्याने ते मान्य केलं पाहिजे. जर तो तसं करत नसेल तर त्याने हा गैरसमज कसा निर्माण झाला, कशामुळे झाला, हे सर्व समोर येऊन सांगावे”, असा सल्लाही शर्लिनने आदिलला दिला आहे.

दरम्यान, राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यात वाद झाला आहे. आधी लग्न स्वीकारण्यास नकार देणाऱ्या आदिल खानने नंतर मारहाण केल्याचे आरोप राखीने केले, तसेच त्याचे अफेअर असल्याचंही तिने सांगितलं. त्यानंतर मारायला घरी आलेल्या आदिलबद्दल तिने पोलिसांत तक्रार दिली. यानंतर आदिल खानला अटक झाली. त्यानंतर त्या कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sherlyn chopra gives a strong statement about rakhi sawant husband adil khan durrani nrp