कलर्स मराठी वाहिनीवरील अनेक मालिका कायमच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर ‘शेतकरी नवरा हवा’ ही मालिका सुरु झाली आहे. मात्र आता ही मालिका एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता या मालिकेचे नाव आणि कथानक चोरल्याचा आरोप केला आहे. सांगलीच्या आटपाडीतील लेखिका मेधा पाटील यांनी याबद्दलचा आरोप केला आहे. याप्रकरणी मेधा पाटील यांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेधा पाटील या माणदेशातील नामवंत साहित्यिकांमधील एक साहित्यिक आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह आणि कादंबऱ्या, पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकीच शेतकरी नवरा ही कादंबरी २०२७ ला प्रसिद्ध झालेली आहे. ही कादंबरी अनेक वाचकांच्या पसंती आहे. ‘शेतकरी नवरा’ ही कादंबरी मेधा पाटील यांनी २०१७ मध्ये प्रकाशित केली होती.
आणखी वाचा : प्राजक्ता माळी पुढच्या वर्षी लग्न करणार का? तिच्या विश्वासू ज्योतिषांनी वर्तवलेलं भविष्य वाचा…

या कादंबरीवरील असणारे नाव आणि कादंबऱ्यातील कथा चोरुन कलर्स वाहिनीवरील एका मालिकेमध्ये ते वापरण्यात आल्या आहेत. शेतकरी नवरा हवा असे या मालिकेचे नाव आहे, असा आरोप मेधा पाटील यांनी केला आहे. मेधा पाटील यांच्याकडून या कादंबरी बाबतीत कोणत्याही प्रकारचे हक्क घेण्यात आलेले नाही. त्यामुळे मेधा पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन निर्मात्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आणखी वाचा : “अस्सल दादरकर, आठ वर्षांचे रिलेशनशिप, लग्न अन्…” ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आलेल्या अपूर्वा नेमळेकरबद्दल माहितीये का?

दरम्यान आटपाडी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु केली आहे. यात कॉपीराईट कायद्याचा भंग झाला आहे का याबद्दल पोलिसांकडून तपास सुरु आहे. आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले आहे. या मालिकेतील रेवा आणि सयाजी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. पण आता या वादानंतर निर्माते काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.