‘बिग बॉस १८’चा सीझन सुरू झाला असून, यात अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये प्रेक्षकांच्या ओळखीचा मराठमोळा चेहराही सहभागी झाला आहे. या अभिनेत्रीच्या ‘बिग बॉस’मधील सहभागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर सध्या ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाली आहे. १९९० च्या दशकात शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर या दोघीही बहिणी लोकप्रिय अभिनेत्री होत्या. नम्रता शिरोडकर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची पत्नी आहे. महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांनी शिल्पाच्या ‘बिग बॉस’मधील सहभागावर अद्याप सार्वजनिकपणे प्रतिक्रिया दिलेली नसली तरी शिल्पाने ‘बिग बॉस १८’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नम्रता आणि महेश दोघेही तिच्यासाठी खूप उत्सुक असल्याचे सांगितले आहे.

शिल्पाने ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यापूर्वी सांगितले, “माझ्याकडे कोणतेही गुपित नाही आणि त्यामुळे मला काहीही लपवायची गरज नाही. मी तिथे जाऊन स्वतःला प्रामाणिकपणे व्यक्त करणार आहे आणि पूर्णपणे मनापासून खेळ खेळणार आहे.”

shilpa shirodkar on namrata shirodka mahesh babu
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकरने बहीण नम्रता व तिचा पती महेश बाबूकडून पाठिंबा न मिळण्याबद्दल सोडलं मौन; म्हणाली, “मला…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Young man dances on madanmajiri song from phullwanti marathi movie video viral on social media
“ती नजर, ती अदा…”, प्राजक्ता माळीच्या मदनमंजिरी गाण्यावर थिरकला तरुण, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकीत
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Aishwarya Narkar
“जर मला डिवचलं, तर मी…”, ऐश्वर्या नारकर ट्रोल करणाऱ्यांच्या बाबतीत करतात ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “काय दिवे…”
Trending video boy from village singing song of nathicha nakhara goosebumps came on people after listing his song viral video
“नथीचा नखरा नऊवारी साडी” शाळकरी मुलाच्या गाण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला लावलं वेड; सूर असा की अंगावर येतील शहारे, VIDEO पाहाच

हेही वाचा…‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा

काय म्हणाले महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर?

शिल्पा शिरोडकरने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “नम्रता आणि महेश माझ्यासाठी खूप आनंदित आहेत. त्यांना माझा खूप अभिमान आहे आणि त्यांना खात्री आहे की, मी जे काही करेन, ते स्वतःच्या मेहनतीने करेन. मी त्यांना नक्कीच गर्व वाटेल, असे काहीतरी करून दाखवेन. ते नेहमीच माझ्या पाठीशी आहेत.”

हेही वाचा…ना सलमान, ना शाहरुख…; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता आहे रणवीर सिंहचा ‘Man Crush’, स्वत: खुलासा करत म्हणाला…

‘बिग बॉस १८’चा होस्ट सलमान खानने बॉलीवूडमध्ये आपली कारकीर्द सुरू केली, त्याच काळात शिल्पा शिरोडकरनेही आपली कारकीर्द सुरू केली होती. मात्र, त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. शिल्पा ‘किशन कन्हैया’, ‘खुदा गवाह’, ‘गोपी किशन’, ‘बेवफा सनम’, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ यांसारख्या चित्रपटांत झळकली होती. दुसरीकडे दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची पत्नी व शिल्पाची बहीण नम्रता शिरोडकरने सलमान खानबरोबर ‘जब प्यार किसीसे होता है’ या चित्रपटात काम केले आहे. शिल्पाने असेही म्हटले आहे की, ती आणि सलमान खान एकमेकांना ओळखतात; मात्र त्यांच्यात मैत्री नाही.

Story img Loader