‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. या कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक अनेकदा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्याचे पाहायला मिळते. पर्व संपले तरी या स्पर्धकांची चर्चा होताना दिसते. आता बिग बॉसच्या १८ व्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर(Shilpa Shirodkar) या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. १०२ दिवस अभिनेत्री या घरात होती. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्री घराबाहेर पडली होती. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने केलेले वक्तव्य चर्चेत आहे. तिने तेलुगु सुपरस्टार महेश बाबू विषयी विधान केले आहे. महेश बाबू तिच्या बहिणीचा नम्रता शिरोडकरचा पती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही?

शिल्पा शिरोडकरने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला विचारले की, जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा तिच्या बहिणीच्या पतीने म्हणजेच महेशबाबूने तिला सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून का पाठिंबा दर्शवला नाही. कारण-यामुळे तिला जिंकण्यास मदत झाली होती. यावर बोलताना शिल्पाने म्हटले, “सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून नात्यांची किंमत केली जाऊ नये. मी बिग बॉसच्या घरात नम्रताची बहीण किंवा महेश बाबूची मेहुणी म्हणून गेले नव्हते. मी जशी आहे, त्यासाठी गेले होते. तो लोकप्रिय आहे, सुपरस्टार आहे म्हणून त्याने माझ्या करिअरचा भाग होणे गरजेचे नाही. महेश आणि नम्रता फार व्यक्त होत नाहीत. पण, हे जग त्यांना गर्विष्ठ हे लेबल पटकन लावते. महेश जास्त व्यक्त होत नसला तरी तो खूप चांगला व्यक्ती आहे. जर कोणत्याही गोष्टीची गरज असेल, तेव्हा तो मदतीला येतो.”

नम्रता व शिल्पा यांचे भांडण झाल्याच्या चर्चादेखील ऐकायला मिळत होत्या. त्यावर बोलताना शिल्पा शिरोडकरने म्हटले, “मी जेव्हा बिग बॉसच्या शोमध्ये येण्यासाठी होकार दिला, तेव्हा मी हैद्राबादमध्ये होते. मी सिताराच्या खूप जवळची आहे. मी तिला अनेक गोष्टी सांगू शकते, ज्या नम्रता सांगू शकत नाही. नम्रताचेदेखील माझ्या मुलीबरोबर तसेच नाते आहे. मी बिग बॉसच्या घरात असताना तिने माझ्या मुलीची तशीच काळजी घेतली. माझ्या बिग बॉसच्या प्रवासाबद्दल माझ्या कुटुंबाला खूप अभिमान आहे. विशेषत: मी जास्त दिवस घरात राहिल्याने ते आनंदी आहेत”, असे म्हणत नम्रता व तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नसल्याचे तिने म्हटले.