टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’चा १६ वा सीझन संपला आहे. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन या सीझनचा विजेता ठरला. अनेकांना यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्रियांका चौधरी आणि शिव ठाकरे हे बिग बॉस १६ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यामुळेच अजूनही एमसी स्टॅन सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण जेव्हा बिग बॉस १६ चा पहिला रनरअप शिव ठाकरेला विजेता एमसी स्टॅनबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने खूपच सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली.

शिव ठाकरे एमसी स्टॅनबद्दल बोलताना म्हणाला, “तो वस्तीतून आलेला मुलगा आहे. एकदम रॉ. प्रेक्षकांबरोबर तो जास्त कनेक्ट झाला आणि तो मनापासून खेळला. त्याने स्वतःसाठी कधीच ट्रॉफीचा विचार केला नाही. मी जिंकावं असंच त्याला नेहमी वाटत होतं. त्यामुळेच तो जिंकल्यानंतर मला जास्त आनंद झाला. कारण तो लोकांची मनं जिंकण्यासाठी आला होता. त्याचा त्या ट्रॉफीवर हक्क होता. मी त्याच्यासाठी खूप खुश आहे.”

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, विरोधकांची टीका
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”

आणखी वाचा- “आई शप्पथ…” शिव ठाकरेला एअर होस्टेसने लिहिली चिठ्ठी, ‘बिग बॉस स्टार’ म्हणाला…

शिव ठाकरे पुढे म्हणाला, “तो बिग बॉसमध्ये असताना नेहमीच मनापासून खेळत राहिला. मनापासून बोललेलं मनापर्यंत पोहोचतं. ज्या गोष्टीवर ज्याचा हक्क आहे त्यालाच ती गोष्ट मिळते. जर तो दोन महिने खेळ समजून घेऊन ट्रॉफी जिंकला असेल तर विचार करा की तो चार महिने गेम खेळला असता तर किती राडे झाले असते. त्याने जे जिंकलं त्यावर त्याचा हक्क होता.”

आणखी वाचा- “त्याने माझ्याकडे फोटो मागितले अन्…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

दरम्यान एमसी स्टॅनचा बराच मोठा चाहता वर्ग आहे, पण जेव्हा तो ‘बिग बॉस 16’ चा विजेता झाला तेव्हा त्याने शोमध्ये काहीही केले नाही, मग त्याने ट्रॉफी कशी जिंकली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या सुरुवातीला खेळ समजला नाही असे तो नेहमी सांगत असे, पण जेव्हा त्याला खेळ समजला तेव्हा शो संपत आला होता. शोच्या शेवटच्या आठवड्यात, एमसी स्टॅन खूप सक्रिय झाला आणि उघडपणे बोलू लागला होता. त्यांचं व्यक्तिमत्व लोकांना खूप आवडलं.

Story img Loader