Shiv Thakare : ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ व हिंदी अशा विविध रिअ‍ॅलिटी शोमधून शिव ठाकरे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आजवर आपल्या सरळ साध्या स्वभावाने त्याने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. एवढंच नव्हे तर ‘बिग बॉस’च्या घरात सुद्धा तो याच सच्चेपणाने वावरला आणि अखेरीस दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला. आताच्या घडीला अमरावतीचा शिव ठाकरे संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला आहे.

शिव ठाकरेच्या ( Shiv Thakare ) आयुष्यात त्याचे कुटुंबीय आणि चाहत्यांना खूप महत्त्व आहे. लहान असो किंवा मोठे शिव प्रत्येकाची तेवढ्याच आपुलकीने विचारपूस करतो. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शिव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. त्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा

हेही वाचा : १६ वर्षांच्या संसारानंतर दिलीप कुमार यांनी गुपचूप केलेलं दुसरं लग्न; सायरा बानो यांना बसलेला मोठा धक्का, नेमकं काय घडलेलं? वाचा

शिव ठाकरेने साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस

शिव ( Shiv Thakare ) या व्हिडीओमध्ये आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला आजीला हाताला धरून शिव गाडीत बसवतो. यानंतर हे दोघं ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या दिशेने निघतात. वाटेत त्याची आजी मोठ्या आवडीने सी-लिंक पाहते. पुढे, ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या समुद्राजवळ शिव ठाकरे आजीला बोटीवर नेतो आणि केक कापून तिचा वाढदिवस साजरा करतो. आजीच्या वाढदिवसासाठी संपूर्ण बोटीवर सजावट केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. केक कापल्यावर शिव आणि त्याची आजी मोठ्या मायेने एकमेकांना मिठी मारतात.

Shiv Thakare
शिव ठाकरे ( Shiv Thakare )

हेही वाचा : भर कार्यक्रमात प्रपोज, रोमँटिक डान्स अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरीच्या पतीची खास पोस्ट, डॉ. नेने म्हणाले…

बोटीवर केक कापल्यावर शिव आपल्या आजीला पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जातो. तर, त्यानंतर दोघंही मुंबई दर्शन करतात. या व्हिडीओमध्ये शिव आणि त्याच्या आजीचं सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्याने या व्हिडीओला “विथ बर्थडे गर्ल #आजी” असं कॅप्शन दिलं आहे.

मेघा धाडेने शिवचा ( Shiv Thakare ) हा व्हिडीओ पाहून अरे! “खूपच गोड एकदम क्यूट तू आणि आजी” अशी कमेंट केली आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांनी देखील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवचा हा साधेपणा पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावला असून या व्हिडीओला तासाभराच्या आत ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader