‘बिग बॉस हिंदी’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेने फक्त मराठी नव्हे तर आता बॉलिवूडकरांच्या मनातही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. बिग बॉसच्या घरात असल्यापासून शिव ठाकरे आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापची सातत्याने चर्चा पाहायला मिळाली. शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात असताना त्याची आई आशाताई ठाकरे यांनी वीणाबद्दल भाष्य केले होते. आता घराबाहेर आल्यानंतर शिव ठाकरेने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरात असताना त्याच्या आईला वीणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिव-वीणाच्या नात्याबद्दल बिग बॉसच्या घरात अनेक चर्चा रंगल्या होत्या, ती बिग बॉसमध्ये ही जाणार होती, असं म्हटलं जात होतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला.
आणखी वाचा : “वीणा जगताप हा विषय संपलाय” शिव ठाकरेची आई स्पष्ट शब्दात म्हणाली “तिने लग्नाचा…”
यावर त्यांनी “वीणा जगताप हा विषय कधीच संपला आहे. ती शिवबरोबर राहिली, तिने सर्व गोष्टींचा अनुभव घेतला. वीणा मुलगी म्हणून खरोखरच उत्तम होती. ती बिग बॉस मराठीच्या घरात शिवची चांगली मैत्रीण झाली. तिने त्यावेळी लग्नाचा ड्रामाही केला. पण त्यानंतर तो विषय संपलाय. हा विषय यापुढे अजिबात काढू नका”, असे आशाताई ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.
यावर आता शिव ठाकरेला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने आईने केलेल्या भाष्यावर स्पष्टीकरण दिले. “वीणाने लग्नाचा काहीही ड्रामा केला नव्हता. असं काहीही झालं. तिने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि मीही तिला तितकाच पाठिंबा दिला आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा कायम आदर करायचो”, असे शिव ठाकरे म्हणाला.
“पण काही गोष्टी या योग्य पद्धतीने झाल्या नाहीत. आता आपल्या प्रत्येकाच्या आईला आपला मुलगा आनंदात राहावा असं वाटत असतं. प्रत्येक आईचा तो विचार असतो. पण काही गोष्टींची कल्पना आईला नाही. त्यात अमरावतीचा मुलगा, जात या सर्व गोष्टी होत्या. तिने कधीही लग्नाचा ड्रामा केलेला नाही”, असे शिव ठाकरेने ठणकावून सांगितले.
आणखी वाचा : “आम्हाला एकमेकांचं तोंड…” शिव ठाकरेने सांगितलं वीणा जगतापशी ब्रेकअप करण्यामागचं खरं कारण
दरम्यान शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली. शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती. पण काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला.