‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत मराठमोळ्या शिव ठाकरेने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरामध्ये होणाऱ्या वादादरम्यान तो स्वतःवर करत असलेलं नियंत्रणही कौतुकास्पद असल्याचं बोललं जातं. ‘बिग बॉस १६’मुळे शिव ठाकरेचं फॅन फोलाईंग प्रचंड वाढलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिव ठाकरेचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. शिवने केलेल्या कामगिरीमुळे नुकताच त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर १ मिलियन फॉलोवर्सचा आकडा गाठला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत शिवच्या टीमने त्याच्या अकाउंट वरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

शिवचा एक फोटो पोस्ट परत त्यांनी लिहिलं, “असं म्हणतात की, स्वप्न बघणं जितकं सोपं असतं पण पूर्ण करणं तितकंच कठीण असतं. पण आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं आपल्याबरोबर असतील तर हे कठीण कामही सोपं होतं आणि आपलं स्वप्न पूर्ण होतं. तुम्ही शिवच्या प्रत्येक स्वप्नात त्याच्या पाठीशी उभे होतात यासाठी शिव स्वतःला भाग्यवान समजतो. जितके आभार मानावे तितके कमी आहेत, पण शिवला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रेमाबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत.”

हेही वाचा : मराठमोळा शिव ठाकरे ‘Bigg Boss 16’चा नवा कॅप्टन; प्रेक्षकांनी निवड केल्याने अर्चनाला बसला धक्का, म्हणाली…

शिव ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिव ज्याप्रकारे खेळत आहे त्याचं सर्वांनाच कौतुक वाटतं. आता त्याच्या या पोस्टवर त्याचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत त्याच्यावर प्रेमाचा, अभिनंदन असा वर्षाव करत आहेत. शिवने ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जिंकावी अशी इच्छाही अनेकांनी कमेंट्स करत दर्शवली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakare completed 1 million followers on instagram rnv