बिग बॉस मराठी व हिंदीतून घरोघरी पोहोचलेलं नाव म्हणजे शिव ठाकरे होय. अमरावतीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेला शिव हा आता तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला आहे. बिग बॉस हिंदीनंतर शिव सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण शिव ठाकरेचा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव असलेल्या ठाकरे कुटुंबाशी काही संबंध आहे का? स्वतः शिवनेच याबद्दल उत्तर दिलंय.

मराठमोळ्या अभिनेत्रीला तीन महिने राजस्थानमध्ये ठेवलेलं डांबून, बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीने झालेली सुटका; म्हणालेली, “बंदुकीची भिती…”

शिव ठाकरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतो. अलीकडेच त्याने लोकमतच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्याला त्याचा उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याशी काही संबंध आहे का? याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर शिव म्हणाला, “माझा राजकारणात असलेल्या ठाकरे कुटुंबाशी काहीही संबंध नाही. पण, माझ्या घरी बाळासाहेबांचा एक फोटो आहे. लहानपणापासून मी पाहत आलोय की शिवसेना व राज ठाकरे मराठी माणसाचा अभिमान आहेत. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबामुळेच आपली कॉलर टाइट होता.”

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

पुढे शिव म्हणाला, “आडनाव सारखं असल्याने इंडस्ट्रीत अनेकांना वाटतं की मी बाळासाहेब ठाकरेंचा नातू आहे. पण ते खूप मोठे लोक आहेत. मी आतापर्यंत फक्त राज ठाकरेंना भेटलो आहे. त्यांना दोन-तीन वेळा भेटलो. त्यांनी कौतुक केलं आणि कधीही मदत लागल्यास सांग,” असंही त्यांनी म्हटलं. तर, ठाकरे कुटुंबाशी आपलं नातं नाही, फक्त आडनाव सारखं असल्याचं शिवने सांगितलं.

Story img Loader