‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले गेल्याच आठवड्यात संपन्न झाला. अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. अखेर यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. विजेतेपद स्टॅनला मिळालं असलं तरीही सगळीकडे चर्चा शिव ठाकरेची होत आहे. या कार्यक्रमात जिंकण्यासाठी शिवला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आता त्या सर्वांना शिवने एक खास वचन दिलं आहे.

‘बिग बॉस १६’ मुळे शिव ठाकरेचा चाहता वर्ग प्रचंड वाढला. ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. या घरातील त्याच्या वागणुकीचं त्याच्या खेळाचं सर्वांनी कौतुक केलं. त्यामुळे बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिवने जिंकावी अशी सर्वांची इच्छा होती. त्यासाठी त्याला त्याच्या चाहत्यांनी तुफान मतंही दिली. आता म्हणूनच शिवने त्याला दिलेल्या या प्रचंड प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ratnagiri assembly defeat , Shivsena Thackeray Ratnagiri , Ratnagiri latest news, Ratnagiri shivsena news,
रत्नागिरी विधानसभेचा पराभवाचा वाद देवाच्या दारात, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना शिक्षा देण्यासाठी घातले गाऱ्हाणे
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
Success story of ias deshal dan ratnu son of tea seller who cleared upsc with 82 rank
शहीद झालेल्या भावामुळे मिळाली प्रेरणा, चहा विक्रेत्याचा मुलगा झाला IAS, वाचा कसा पार केला टप्पा
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान शिव म्हणाला, “बिग बॉसच्या घरामध्ये मला माझ्याकडून गोष्टी बरोबर होत नाहीत तसं वाटायचं. पण मी बाहेर आल्यानंतर तुम्हा सर्वांकडून मिळत असलेलं प्रेम अनुभवलं, आजही अनुभवतोय. तुम्ही मला दिलेली मतं, तुम्ही दर्शवलेला पाठिंबा, तुम्ही माझ्यावर केलेलं भरभरून प्रेम…मंडली या ग्रुपला आणि एका कॉमन मॅनला तुम्ही दिलेला इतका मोठा प्रतिसाद पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. मी तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत शिव ठाकरे जिवंत आहे तोपर्यंत मी कायम तुमच्याबरोबरच असेन.”

हेही वाचा : Video: फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर…; शिव ठाकरेचं अमरावतीत दणक्यात स्वागत, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान ‘बिग बॉस १६’ नंतर शिव ठाकरेला सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे असं समोर आलं होतं. त्यामुळे त्याला आता सलमान बरोबर स्क्रीन शेअर करताना बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे शिव ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी सिझनमध्ये दिसणार कमेंट बोललं जात आहे.

Story img Loader