‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय अॅक्शन गेम शोचे १३वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दक्षिण आफ्रिकेत शोचं शुटिंग करत आहेत. सहभागी स्पर्धक सोशल मीडियावर तिथले फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच या शोबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो भारतीय वंशाच्या मॉडेलला करतोय डेट, कोण आहे नीलम गिल?
या शोमध्ये मराठमोळा शिव ठाकरे सहभागी झाला आहे. ‘बिग बॉस १६’ चा उपविजेता शिव शोचा पहिला फायनलिस्ट बनल्याची माहिती समोर आली आहे. ‘टेली चक्कर’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शिव ठाकरे या शोचा पहिला फायनलिस्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, शिव ठाकरे पहिला फायनलिस्ट असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे.
“तुझा आणि करीना कपूरचा संबंध काय?” अभिनेत्रीचा ‘ढोबळी’ उल्लेख करत अवधूत गुप्ते म्हणाला, “ती माझ्या…”
शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’चा विजेता आहे आणि तो ‘बिग बॉस १६’ चा उपविजेता आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. ‘रोडीज’ व ‘बिग बॉस’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला शिव तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. शोमध्ये त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांची मनं जिंकली. बिग बॉसच्या घरातही त्याला खूप पसंत केलं गेलं. त्यानंतर आता ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वात त्याला पाहायला चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’चे १३ वे पर्व दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करणार आहे. या शोमध्ये शिव ठाकरेसह ऐश्वर्या शर्मा, डेझी शाह, अर्जित तनेजा, शिझान खानसह अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत.