‘बिग बॉस हिंदी’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. शिव ठाकरेने फक्त मराठी नव्हे तर आता बॉलिवूडकरांच्या मनातही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बिग बॉस १६ च्या घरातून परत आल्यापासून सातत्याने तो चर्चेत आहे. नुकतंच शिवची आई आशाताई ठाकरे यांनी त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापबद्दल भाष्य केले.

शिव ठाकरे आणि वीणा जगताप ही जोडी बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली. शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची लव्हस्टोरी खूप गाजली. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. शिव-वीणा या दोघांनीही सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दलची कबुली दिली होती. पण काही वर्षांनी त्यांचा ब्रेकअप झाला.
आणखी वाचा : शिव ठाकरे आणि वीणाचा ब्रेकअप नेमका कधी झाला? समोर आली खरी तारीख 

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
Anand Dighe and Balasaheb Thackeray
Private:
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”

नुकतंच शिवच्या आईला वीणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शिव-वीणाच्या नात्याबद्दल बिग बॉसच्या घरात अनेक चर्चा रंगल्या होत्या, ती बिग बॉसमध्ये ही जाणार होती, असं म्हटलं जात होतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला.

“वीणा जगताप हा विषय कधीच संपला आहे. ती शिवबरोबर राहिली, तिने सर्व गोष्टींचा अनुभव घेतला. वीणा मुलगी म्हणून खरोखरच उत्तम होती. ती बिग बॉस मराठीच्या घरात शिवची चांगली मैत्रीण झाली. तिने त्यावेळी लग्नाचा ड्रामाही केला. पण त्यानंतर तो विषय संपलाय. हा विषय यापुढे अजिबात काढू नका”, असे शिवची आई आशाताई ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.

आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला

दरम्यान बिग बॉस १६ च्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोट होते. या पाच जणांमध्ये एमसी स्टॅनला सर्वाधिक मतांनी विजयी ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी, ३१ लाख आणि गाडी देण्यात आली.

Story img Loader