‘बिग बॉस’मुळे शिव ठाकरे प्रसिद्धीझोतात आला. या कार्यक्रमामुळे त्याचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणावर वाढला. गर्लफ्रेंड वीणा जगतापनंतर ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेचं नाव निमृत कौर अहलुवालियाबरोबर जोडलं गेलं होतं. तर त्यानंतर शिव हा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. अनेक कार्यक्रमांदरम्यान शिव व आकांक्षाला स्पॉट केलं गेल्यामुळे या चर्चा रंगल्या. आता शिव ठाकरेने त्याच्या आणि आकांक्षामध्ये असलेल्या नात्यावर मौन सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बिग बॉस’नंतर शिव ठाकरे आता ‘खतरों के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. या कार्यक्रमासाठी तो जय्यत तयारी करत आहे. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आकांक्षा आणि त्याच्या नात्याबद्दल ज्या चर्चा सुरू होत्या त्यावर भाष्य करत त्याची बाजू मांडली आहे.

आणखी वाचा : शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक? एका एपिसोडसाठी मिळणार ‘इतकी’ रक्कम

शिव म्हणाला, “मला अफवा निर्माण झालेला शिव ठाकरे बनायचं नाहीये. मला माझ्या आयुष्यात एक सामान्य व्यक्ती हवी आहे, जिला प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाची गरज भासणार नाही. प्रेम किंवा नाती एका दिवसात तयार होत नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा त्या व्यक्तीबरोबर वेळ घालवता, त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करता. सध्या माझं सर्व लक्ष ‘खतरों के खिलाडी’वर आहे. आता मला काम मिळालं आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला खूप वर्षं लागली‌. पण एक वेळ अशी नक्की येईल जेव्हा मला योग्य जोडीदार मिळेल आणि कोणत्याही दिखाव्याची गरज भासणार नाही.”

हेही वाचा : काय सांगता! ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरेने नाकारल्या २ मोठ्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स, कारण स्पष्ट करत म्हणाला…

शिव ठाकरेचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे. शिवच्या या बोलण्यावरून तो आकांक्षाला डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर मध्यंतरी आकांक्षाने देखील यावर भाष्य करत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. आता शिवने भाष्य करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.