शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी २’मध्ये सहभागी झाला आणि त्याला वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमामध्ये त्याची आणि वीणा जगतापच्या नात्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पर्वादरम्यान ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकमेकांना काही काळ त्यांनी डेटही केलं. पण काही कारणाने त्यांचं हे नातं पुढे जाऊ शकलं नाही आणि त्यांनी ब्रेकअप केलं. तर आता शिवने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस मराठी २’मध्ये विजेता ठरल्यानंतर शिव ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वामध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमातील त्याच्या वागणुकीने सर्वांची मनं जिंकली. परंतु या पर्वामध्ये त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसं जरी असलं तरी त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. वीणाशी ब्रेकअप केल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात कोणी मुलगी आहे का, याचे उत्तर त्याने स्वतःच दिलं आहे.

आणखी वाचा : शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक? एका एपिसोडसाठी मिळणार ‘इतकी’ रक्कम

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी सिंगल आहे. माझ्या आयुष्यात आता कोणीही मुलगी नाही. आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तेच माझं प्रेम आहे. जे काही प्रेम करायचं होतं ते कॉलेजच्या दिवसांमध्ये करून झालं. आता आपलं करिअर स्ट्रॉंग बनवण्याची वेळ आहे. याआधी मी वीणाशी रिलेशनशिपमध्ये होतो आणि आम्ही आमचं नातं कोणाहीपासून कधी लपवून ठेवलं नाही. आमच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहीत होतं. पण आम्ही ब्रेकअप केल्यानंतर आमच्या फॅन्समध्ये वाद निर्माण झाले. पण यापुढेही माझी लव्ह लाईफ ही उघड असेल. लोक माझ्याबद्दल, माझ्या प्रेमाबद्दल काय बोलतात याचा मला काहीही फरक पडत नाही आणि मला त्याची भीतीही वाटत नाही.”

हेही वाचा : काय सांगता! ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरेने नाकारल्या २ मोठ्या मराठी चित्रपटांच्या ऑफर्स, कारण स्पष्ट करत म्हणाला…

आता त्याचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. पण सध्या तो सिंगल राहून त्याच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करत असल्याने त्याचे चाहते त्याला प्रोत्साहन देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakare opens up about his relationship status and also talked about his affair with veena jagtap rnv