लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे नेहमी चर्चेत असतो. ‘रोडिज’, ‘बिग बॉस मराठी २’, हिंदी ‘बिग बॉस १६’, ‘खतरों के खिलाडी १३’, ‘झलक दिखला जा ११’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमुळे शिव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यानं इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. असा हा लोकप्रिय मराठमोळा शिव नुकताच पापाराझींना सुनावताना दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अलीकडेच तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पूनम पांडेची उप्स मुमेंट पाहायला मिळाली होती. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला खूप ट्रोल केलं गेलं. दिव्या अग्रवालाच्या बर्थडे पार्टीमधील पूनमचा हा व्हिडीओ होता.

हेही वाचा – Video: सिद्धार्थ शुक्लाच्या आईने दिवंगत लेकाचा ‘असा’ साजरा केला जन्मदिवस, सेलिब्रेशनमध्ये शहनाज गिलची अनुपस्थिती

या व्हिडीओमध्ये दिव्या आणि पूनम पापाराझींसमोर पोझ देत असतात. पण तेव्हाच दिव्या पूनमला उचलून एका बाजूला घेऊन जाते. त्यावेळी पूनमचा ड्रेस वरती होतो आणि तिच्या लक्षात येताच ती पर्सने लगेच झाकते. त्यानंतर पूनम पापाराझींना तो व्हिडीओ सोशल मीडियावर न टाकण्याची विनंती करते. पण तरीही पापाराझींनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून खूप व्हायरल झाला आहे. त्यावरून शिव ठाकरेने पापाराझींना सुनावलं आहे.

हेही वाचा – Video: वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौलींचा भन्नाट डान्स, पत्नीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, तरुणाईला लाजवेल अशी दिग्दर्शकाची एनर्जी

शिव ठाकरे माध्यमांशी संवाद साधताना पूनम पांडेच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “तुम्ही लोक चुकीचे आहात. तुम्हाला त्या व्हिडीओबद्दल माहित होतं. पूनम पांडे बोल्ड असली तरी ती मुलगी आहे. तुम्ही व्ह्यूजसाठी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला.”

हेही वाचा – Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ

दरम्यान, पूनम पांडेने देखील स्वतःचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली. व्हिडीओ पब्लिश नका करू असं सांगूनही केल्याने तिने नाराजी व्यक्त केली होती

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakare reaction on poonam pandey viral video pps