Shiv Thakare Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 Winner: बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. ७० दिवसांचा प्रवास करून सर्व स्पर्धकांना मागे टाकत त्याने बाजी मारली आणि बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व जिंकल्यावर ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या सूरजने हा शो जिंकल्यावर शिव म्हणाला, “ज्याला त्या ट्रॉफीची आणि ट्रॉफीपेक्षा पैशांची, ज्याचं आयुष्य बदलणार होतं, त्याच्या हाती ट्रॉफी गेली आहे. आपण म्हणतो ना की साधा, भोळा ज्याच्या मनात कपट नाही, याच गोष्टी आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात पटकन घर करतात. सूरजच्या हक्काची ट्रॉफी होती, तो डिझर्व्ह करत होता.”

Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Uddhav Thackeray on CM Post
Uddhav Thackeray : “माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पद घुसलंय…”, मविआतील मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचवरून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका!
Sharad Pawar and Raj Thackeray
“मी जातीयवादी असल्याचा पुरावा द्या” म्हणणाऱ्या शरद पवारांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “जेव्हा पुण्यात…”
Bala Nandgaonkar Statement on Uddhav and Raj Thackeray
Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Raj Thackeray in ghatkopar
Raj Thackeray in Ghatkopar : “नालायक ठरलो तर…”, राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन; म्हणाले, “सत्ता नसताना…”

सूरज चव्हाण Bigg Boss Marathi 5 चा विजेता ठरल्यावर जिनिलीया देशमुख म्हणाली, “याला म्हणतात…”

अभिजीत सावंतचा गेम चांगला होता पण…

“खेळ पाहिल्यास मी म्हणेन की अभिजीत सावंतचा गेम चांगला होता, पण सूरज चव्हाणला गेम कळलाच नाही. त्याच्या साधेपणामुळे महाराष्ट्रातील लोकांना तो भावला आणि त्याच्या हाती ट्रॉफी आली. राज्यभरातील लोकांनी त्याच्यासाठी मेहनत घेतली आहे. त्याच्यासाठी रॅली निघाली. लोक मला म्हणायचे आपला सूरज आहे. लोकांच्या मनात त्याच्यासाठी खूप आपुलकी आहे आणि त्याला ट्रॉफी मिळाली. गणपती बाप्पांनी त्याला आणखी पुढे न्यावं. तो देवाचा मुलगा आहे,” असं शिव ठाकरे न्यूज १८ लोकमतशी बोलताना म्हणाला.

Bigg Boss Marathi 5: ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडल्यावर जान्हवी किल्लेकरची पहिली पोस्ट, म्हणाली, “७० दिवसांच्या…”

सूरजमध्ये माणुसकी आहे – शिव ठाकरे

सूरज चव्हाणच्या रील्सबद्दल शिव म्हणाला, “तो ज्या गोष्टी करायचा सोशल मीडियावर त्या मलाही नव्हत्या आवडल्या. पण तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याच्यात माणुसकी आहे जी आजकाल खूप कमी लोकांमध्ये दिसते. मला वाटतं आता देवाने तिला तिथे पोहोचवलं आहे. येत्या काळात त्याचे मोठमोठे प्रोजक्ट यायला पाहिजे. त्याला देवाने इथे पोहोचवलंय तर आणखी पुढेही नेईल.”

Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”

सूरजप्रमाणेच इतरांना संधी मिळायला हवी – शिव ठाकरे

शिव ठाकरेनंतर यावेळी सूरज चव्हाण जिंकला. यामुळे बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्य माणूस विजेता ठरू शकतो हे सिद्ध झालंय, असं शिवने नमूद केलं. “जो एका छोट्या गावातून, एका छोट्या घरातून येतो, जो आधीच खूप संकटातून बाहेर येतो, त्याला बिग बॉसमधील टास्क आणि बाकी गोष्टी खूप छोट्या वाटतात. अशा लोकांना जेवणात एखादी पोळी कमी मिळाली, चहा नाही मिळाला तरी त्या गोष्टी लहान वाटतात. कारण तो खूप गोष्टी पाहून इथवर पोहोचला असतो. सूरजप्रमाणेच इतर लोकांनाही संधी मिळायला हवी, कला असलेल्या लोकांना संधी मिळायला हवी. सूरजला आणणाऱ्या बिग बॉसच्या टीमला सलाम”, असं शिव ठाकरे म्हणाला.