‘बिग बॉस १६’च्या घरात एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अब्दु रोझिक, सुम्बुल तौकीर, साजिद खान व निमृत कौर अहुवालिया यांच्यात चांगली मैत्री झालेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरातील या मंडलीने प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. परंतु, आता या मंडलीतील स्टॅन व अब्दुच्या नात्यात दुरावा आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अब्दु व स्टॅनच्या मैत्रीबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर स्टॅनबरोबर मैत्री तुटल्याचा खुलासा अब्दुने केला होता. “एमसी स्टॅनमुळे माध्यमांमध्ये माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. तो माध्यमांमध्ये मी वाईट आहे, असं म्हणतोय, त्यामागचं कारण मला माहीत नाही. पण आता मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आमची मैत्री तुटली”, असं अब्दु रोझिक म्हणाला होता. याशिवाय स्टॅन फोन उचलत नसल्याचंही अब्दुने सांगितलं होतं.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Sanjay Raut on Raj Thackeray
Sanjay Raut on Raj Thackeray: “राज ठाकरे भाजपाच्या हातातलं…”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांची टीका
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!

हेही वाचा>> Video: मैत्री तुटली! एमसी स्टॅनबद्दल स्पष्टच बोलला अब्दू रोझिक; म्हणाला, “त्याच्यामुळे माझ्याबद्दल…”

अब्दु व स्टॅनच्या मैत्रीच्या नात्याबाबत शिव ठाकरेने मौन सोडलं आहे. शिवने ईटाइम्सशी बोलताना याबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, “त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. अब्दु आणि एमसी स्टॅनमध्ये छोटासा गैरसमज झाला आहे. बाकी काही नाही”.

एमसी स्टॅन व अब्दु रोझिकमधील मैत्री तुटली? शिव ठाकरे म्हणाला

“मंडलीमध्ये सगळे एकमेकांबरोबर व्यवस्थित बोलत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका पार्टीदरम्यान आम्ही सगळे भेटलो. फक्त एमसी स्टॅनला त्याच्या कॉन्सर्टमुळे या पार्टीत यायला जमलं नाही. अशा छोट्या गोष्टींमुळे मंडली तुटणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मंडली तुटू देणार नाही. लवकरच आम्ही सगळे भेटणार आहोत”, असंही शिव पुढे म्हणाला.

Story img Loader