मराठमोळा शिव ठाकरे सध्या ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या १३ व्या पर्वात दिसत आहे. तो ‘बिग बॉस १६’ चा उपविजेता होता. शिव ‘बिग बॉस’च्या घरात असताना त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापचे नाव बरेच चर्चेत होते. तिच्या नावाचा उल्लेख करत सोशल मीडियावर ट्रोलिंगही झाली होती. या संपूर्ण प्रकरणाबद्दल शिव ठाकरेने भाष्य केलंय.
“स्टंट कर…”, ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये जखमी झालेल्या शिव ठाकरेला आईने दिलेला सल्ला
शिव म्हणाला, “उगाच कोणत्याही गोष्टी होत नाहीत. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल जाहीरपणे सोशल मीडियावर बोलता, त्यानंतर उगाच होत नाही. कारण तुम्ही भूतकाळात काही गोष्टी केल्या असतात. तुमच्यासाठी तो बाँड, ते नातं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे नातं संपल्यानंतरही समोरच्याला इजा न होऊ देता तुम्ही ते कसं जपता हे महत्त्वाचं आहे, कारण तो बाँड आणि नातं तुमचं होतं, तुमच्या कुटुंबाचं नाही. काही गोष्टी आमच्या दोघांनाच माहीत होत्या, आमच्या कुटुंबाला नाही आणि लोकांनाही नाही. त्या गोष्टी मी जशा हाताळायला हव्या होत्या तशा मी हाताळल्या.”
‘बाईपण भारी देवा’तील अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी; मुलीचे फोटो शेअर करत म्हणाली…
सिनेमा व रिअॅलिटी शोमधील फरकाचा संदर्भ देत शिव पुढे म्हणाला, “सिनेमा म्हटलं की एक कॅरेक्टर प्ले होतं, पण रिअॅलिटी शो म्हटलं की तिथे तुम्ही स्वतः दिसता. त्यामुळे काही गोष्टी घडतील, असा मला अंदाज होताच. मी तेवढा स्ट्राँग आहे की माझ्या बाँडसाठी उभा राहील. तो कसा जपायचा हे मला माहीत आहे, कारण मी तो आतापर्यंत जपत आलोय. समोरची व्यक्ती माझ्या सोबत असूदे नसूदे मला तिच्या डोळ्यात अश्रू नकोय. सोशल मीडियावरील लोकांना काही गोष्टी माहीत नाहीत. पण मी त्यांना गप्प करण्यापेक्षा त्या व्यक्तीला (वीणाला) सांभाळलं, दोन्ही कुटुंबाला सांभाळलं,” असं त्याने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.