मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा व अभिनेता सत्या मांजेरकरने नवीन व्यवसाय सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. त्याच्या हॉटेलची सध्या चांगलीच चर्चा आहे. सत्याने त्याच्या हॉटेलचं नाव ‘सुका सुखी’ असं ठेवलं आहे. चार दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून चमचमीत जेवण ऑर्डर केलं होतं. त्यानंतर आता शिव ठाकरेनेही त्याच्या हॉटेललं भेट दिली आहे.

Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

शिव ठाकरे लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. त्यापूर्वी त्याने मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. बाप्पांच्या चरणी पोहोचून शिवने आशीर्वाद घेतले, नंतर त्याने सत्या मांजरेकरच्या नव्या हॉटेलला भेट दिली. शिवने इन्स्टाग्रामवर सत्या मांजरेकरबरोबर त्याच्या हॉटेलबाहेरचा फोटो शेअर केला आहे. ‘नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा, सत्या मांजरेकर,’ असं कॅप्शन शिवने या फोटोला दिलंय.

shiv thakare at satya manjarekar hotel
शिव ठाकरेची स्टोरी

दरम्यान, महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. अनेक मराठी कलाकार सत्याच्या हॉटेलमधून जेवण मागवून त्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

Story img Loader