मराठमोळ्या शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी होऊन त्याने त्याची छाप सर्वांवर पाडली. ‘बिग बॉस १६’ संपताच शिवकडे नवीन प्रोजेक्टच्या ऑफर्सची रांग लागली आहे. रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि लवकरच तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसणार आहे. आता या कार्यक्रमासाठी त्याला किती मानधन मिळणार आहे हे समोर आलं आहे.

शिव ठाकरे सध्या खतरो के खिलाडी च्या या आगामी सीझनसाठी तयारी करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता, त्याला आगीची भीती वाटत नाही पण पाण्याची भीती वाटते कारण त्याला पोहता येत नाही. त्यामुळे सध्या तो पोहण्याचा सराव करत आहे. पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली आहे.

Pune video Police Honored with Aarti During Ganeshotsav
अहोरात्र भाविकांसाठी राबणाऱ्या पोलिसांना मिळाला आरतीचा मान, पुण्याच्या नवी सांगवीतील VIDEO होतोय व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
Mumbai latest marathi news
विश्लेषण: गर्भश्रीमंत मुंबई महापालिकेवर मुदतठेवी मोडण्याची वेळ का येते?
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार
ondc launches digital credit services
‘ओएनडीसी’वरून आता खेळत्या भांडवलासाठी डिजिटल कर्ज

आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वाचा शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे असं बोललं जाऊ लागलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी त्याला ५ ते ६ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दर आठवड्याला तो १० ते १२ लाख रुपये कमावणार आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

त्यामुळे आता शिव ठाकरेला या कार्यक्रमांमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. हा कार्यक्रम कधी सुरू होणार आणि या कार्यक्रमांमध्ये आणखी कोण कोण कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.