Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar Pre Wedding Rituals : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तिच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. आता मनोरंजन विश्वातील आणखी एका अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता शाल्व किंजवडेकर या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाल्व किंजवडेकर वैयक्तिक आयुष्यात श्रेया डफळापुरकरशी लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांचा साखरपुडा २०२३ मध्ये पार पडला होता. शाल्व आणि श्रेयाने या वर्षाच्या सुरुवातीलाच केळवणाचे फोटो शेअर करत विवाहबंधनात अडकणार असल्याची हिंट सर्वांना दिली होती. आता नुकताच श्रेयाच्या घरी ग्रहमख सोहळा पार पडला आहे.

हेही वाचा : Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”

ग्रहमखसाठी श्रेयाने पारंपरिक लूक करून तयार झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नारिंगी रंगाची साडी, मुंडावळ्या, गळ्यात मोत्याचा छानसा नेकलेस या साध्या अन् सुंदर अशा पारंपरिक लूकमध्ये श्रेया अतिशय सुंदर दिसत आहे.

श्रेयाच्या आणखी एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर ग्रहमख सोहळ्यादरम्यानचा फोटो शेअर करत त्याला ४ दिवस बाकी असं कॅप्शन दिलं आहे. यावरून आता शाल्व-श्रेयाच्या लग्नाला मोजकेच काही दिवस उरल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : दिल्लीतील लग्नात डान्स करण्यासाठी शाहरुख खानने किती रुपये घेतले? नववधूच्या मेकअप आर्टिस्टने केला खुलासा

श्रेया काय काम करते?

शाल्वची होणारी पत्नी श्रेया ही कॉस्ट्युम डिझायनर व स्टायलिश म्हणून ओळखली जाते. ‘Styling By Shreya’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी तिने डिझायनर म्हणून काम सांभाळलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांची श्रेया खास मैत्रीण आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर

‘शिवा’ फेम अभिनेता शाल्वची होणारी पत्नी श्रेया ( Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar Pre Wedding )

दरम्यान, शाल्वच्या ( Shalva Kinjawadekar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘शिवा’ मालिकेत आशुतोष ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva fame actor shalva kinjawadekar and shreya daflapurkar wedding rituals sva 00