Shiva Fame Actor Shalva Kinjawadekar Mehendi Ceremony : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असणारी ‘शिवा’ या दोन्ही मालिकांमुळे अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत लोकप्रिय झाला. आपल्या सहज सुंदर अभिनयाने शाल्वने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेता वैयक्तिक आयुष्यात गेली अनेक वर्ष श्रेया डफळापुरकरला डेट करत होता. गेल्यावर्षी या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर शाल्व-श्रेया केव्हा लग्न करणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती अखेर आता यांची लग्नघटिका समीप आलेली आहे.
मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच किरण गायकवाड आणि वैष्णवी यांचा मेहंदी सोहळा पार पडला होता. आता या पाठोपाठ शाल्व – श्रेयाच्या लग्नाआधीच्या विधींना देखील सुरुवात झालेली आहे. श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकणार लग्नबंधनात
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या जोडप्याने Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच श्रेयाच्या हातावर शाल्वच्या नावाची सुंदर अशी मेहंदी सजली आहे. शाल्वची होणारी पत्नी श्रेया ही कॉस्ट्युम डिझायनर व स्टायलिस्ट म्हणून ओळखली जाते. ‘Styling By Shreya’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे. अनेक सेलिब्रिटींसाठी तिने डिझायनर म्हणून काम सांभाळलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच कलाकारांची श्रेया खास मैत्रीण आहे.
शाल्व आणि श्रेयाच्या मेहंदी सोहळ्याला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला केळवणाचे फोटो शेअर करत शाल्वने तो विवाहबंधनात अडकणार असल्याची हिंट चाहत्यांनी दिली होती. आता केळवण, व्याहीभोजन, ग्रहमख, मेंहदी, हळद असे सगळे समारंभ पार पडल्यावर आता येत्या दोन दिवसात हे दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, शाल्वच्या ( Shiva Fame Actor ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘शिवा’ मालिकेत आशुतोष ही प्रमुख भूमिका साकारत आहे.