‘शिवा'(Shiva) ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसते. या मालिकेतील शिवा, आशू, सिताई, रामभाऊ, दिव्या, चंदन, किर्ती, पाना गँग, बाई आजी, वंदना अशी सगळीच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक ही पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. शिवा तिच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखली जाते. धाडसी आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवणारी शिवा प्रेक्षकांची लाडकी आहे. तर थोडा लाजरा आशूदेखील प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो.
आता काही दिवसांपूर्वी मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. ज्या शिवाचा सिताई तिरस्कार करत होती, त्याच सिताईने शिवाला तिच्या वेगळेपणासह तिची सून म्हणून स्विकारले. सिताईची मुलगी व आशूची बहीण किर्ती मात्र अजूनही शिवाविरूद्ध कारस्थान करत असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. आता मात्र हे कलाकार मालिकेतमुळे नाही तर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.
‘शिवा’ मालिकेतील कलाकारांचा भन्नाट डान्स
शिवा मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सृष्टी बहेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवा, दिव्या, बाई आजी, चंदन आणि पाना गँग एकत्र ‘त्या नटीनं मारली मिठी’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. सध्या हे गाणे ट्रेडिंग असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. काही जणांनी फेटाही घातला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने गुढीपाडवा स्पेशल असे लिहिले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
शिवा मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिकने शिवा ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाताना दिसते. तिची अनोखी स्टाईल प्रेक्षकांना आवडते. पूर्वा कौशिक शिवा या भूमिकेतून प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन करताना दिसते. तर आशू या भूमिकेत अभिनेता शाल्व किंजवडेकर काम करताना दिसत आहे.
दरम्यान, आता शिवा मालिकेत पुढे काय होणार, किर्ती व दिव्या कारस्थान करणे थांबवणार का, सिताई व शिवाची जोडी काय धमाल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.