Shalva Kinjawadekar -Shreya Daflapurkar Wedding Photo : सध्या मराठी मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रेश्मा शिंदे लग्नबंधनात अडकली. त्यानंतर मराठी अभिनेता शाल्व किंजवडेकरने लग्नगाठ बांधली आहे. शाल्वने गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ चांदेकरने शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापूरकर यांच्या लग्नातील पहिला फोटो शेअर केला आहे. शाल्व व श्रेया दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या लग्नासाठी खास लाल रंगाचा पोषाख निवडला होता. सिद्धार्थने या नवविवाहित जोडप्याबरोबरचा एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

हेही वाचा – रेश्मा शिंदेचा पती पवन काय काम करतो? अभिनेत्रीसाठी घेतलाय भारतात परतण्याचा निर्णय; म्हणाली, “युकेमध्ये तो…”

फाहा फोटो –

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला शाल्व किंजवडेकरच्या लग्नातील फोटो (फोटो – इन्स्टाग्राम)

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘शिवा’ या मालिकांमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता शाल्व किंजवडेकरने आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यावर शाल्व व श्रेया आज (१४ डिसेंबर रोजी) लग्नबंधनात अडकले. श्रेया ही सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे.

हेही वाचा नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापूरकर दोघांनी त्यांच्या मेहंदी व हळदी समारंभाचे फोटोही शेअर केले होते. त्यांच्या लग्नाला गेलेल्या सिद्धार्थ चांदेकरने या नवविवाहित जोडप्याची पहिली झलक फोटोमध्ये शेअर केली. दरम्यान, शाल्व व श्रेया यांनी गेल्या वर्षी साखरपुडा केला होता. तेव्हापासून या जोडप्याच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. अखेर त्यांचं लग्न पार पडलं आहे. या जोडप्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva fame marathi actor shalva kinjawadekar married to shreya daflapurkar siddharth chandekar shared photo hrc