आशू आणि शिवा(Shiva) ही जोडी आता घराघरांत पोहोचली आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होत असलेली शिवा ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाचा स्पष्टवक्तेपणा, धाडस, वडील गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी घेणं, आशूबरोबरची मैत्री, अगदी लग्नाच्या वेळी बहीण पळून गेल्यामुळे आशूबरोबर करावे लागलेले लग्न, त्यानंतर त्याच्या कुटुंबाला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न यांमुळे शिवाची भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्याबरोबरच आशू, सिताई, रामभाऊ, पाना गँग, दिव्या, चंदन ही आणि इतर पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. आता या मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. त्यामध्ये आशूच्या कुटुंबावर मोठे संकट आले असून, त्याला सामोरे जाण्यासाठी शिवा आणि आशू एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.

zee marathi awards shiva fame purva phadke emotional video
Video : आज आई-बाबा असते तर…; पुरस्कार मिळताच पालकांच्या आठवणीत ‘शिवा’ला अश्रू अनावर; मुक्ता बर्वेने दिला धीर
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
zee marathi new serial tula japnar aahe first glimpses
‘झी मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! ‘लक्ष्मी निवास’ पाठोपाठ सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका, पाहा पहिली झलक
aishwarya narkar did not won best villain award replied to netizen question
“खलनायिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला पाहिजे होता…”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर काय म्हणाल्या ऐश्वर्या नारकर? उत्तर एकदा पाहाच…
Viral student answer sheet makes teacher shocked making people crazy big boss marathi suraj Chavan answer viral photo
PHOTO: बिग बॉसचा लहान मुलांवरही परिणाम! परीक्षेत लिहलेलं उत्तर वाचून शिक्षक कोमात; उत्तरपत्रिका वाचून पोट धरुन हसाल
vidya balan did not see mirror for 6 months
“ही कुठल्या अँगलने हिरोईन दिसते” असं म्हणत निर्मात्याने विद्या बालनचा केला होता अपमान, किस्सा सांगत म्हणाली, “सहा महिने…”
riteish and genelia deshmukh
दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”
mrinal kulkarni mother dr veena dev passed away
“शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे…”, आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णींची भावुक पोस्ट; साहित्य विश्वावर शोककळा

आशू आणि शिवाच्या कुटुंबावर मोठं संकट

प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, काही लोक जबरदस्तीने आशूच्या घराच्या आवारात येतात. ते ‘हाय हाय’ अशा घोषणा देत आहेत. आवाज ऐकून सिताई, आशू आणि शिवा घराबाहेर येतात. आमच्या मागण्या मान्य करा, कष्टाचे पैसे मिळालेच पाहिजेत, असे बोर्ड त्यांच्या हातात आहेत. त्यातील एक माणूस म्हणतो, त्यांच्यासारखं यालासुद्धा काळं फासा. तोपर्यंत कोणीतरी चप्पल फेकते. ती सिताईला लागणार तितक्यात शिवा ती चप्पल पकडते. आशू संतापाने म्हणतो, “कोणाची हिंमत झाली चप्पल फेकायची?” शिवा म्हणते, “तोंडाने बोललेलं कळत नसेल ना, तर मला दुसरी भाषा वापरता येते. एकानंही पाऊल पुढे टाकलं, तर याद राखा. आमच्या कुटुंबावर नजर टाकण्याआधी तुम्हाला आमच्याशी भिडावं लागेल.” अचानक घडलेल्या या घटनेने सिताईच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यांत पाणी दिसत आहे.

झी मराठी इन्स्टाग्राम

झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना, “कुटुंबाच्या रक्षणासाठी एकत्र आले आशू आणि शिवा..!” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: प्रिया बापटने गायलं ५६ वर्षांपूर्वीचं सुपरहिट बॉलीवूड गाणं! सुमधूर आवाजाचं सर्वत्र होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले, “अप्रतिम…”

दरम्यान, मालिकेत शिवा आणि आशू नुकतेच फिरायला गेले होते. तिथे शिवाने हटके स्टाईलने आशूला प्रपोजदेखील केले होते. आता मालिकेत पुढे काय होणार, नक्की काय घडणार आणि शिवा आणि आशू या संकटाला कसे सामोरे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.