प्रत्येक मालिकेत जसे सकारात्मक पात्रे असतात, तशीच नकारात्मक पात्रेदेखील असतात. ही पात्रे कट कारस्थान करताना दिसतात. नायक नायिकेच्या विरोधात काही वाईट गोष्टी करताना दिसतात. मात्र, सर्व पद्धतीच्या पात्रांमुळे एखाद्या मालिकेला वेगळी ओळख निर्माण होते. नायक-नायिकांसह खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनादेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळताना दिसते. आता ‘शिवा'(Shiva) मालिकेत किर्ती व दिव्या सतत शिवा व आशूविरूद्ध कट कारस्थान करताना दिसतात. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये किर्तीला सीताईं कानाखाली मारणार असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की,शिवाच्या घरातील सर्वजण आशू व शिवाची वाट पाहत आहेत. तितक्यात शिवा व आशू घरी येतात. त्यांना पाहून सर्वांना आनंद होतो. पण त्यांना पाहून शिवाची बहीण किर्ती म्हणते, “तुम्हा सगळ्यांचं हे जे काही चालू आहे ना, ते मला अजिबात पटत नाहीये. त्यामुळे मी त्यांना आत येऊ देणार नाहीये. मान वर करून घर सोडून निघून गेला होता ना. आता कशाला परत आलाय? किर्तीचे बोलणे ऐकून आशू म्हणतो, आईसाठी परत आलोय. त्यावर किर्ती म्हणते, जाताना हा विचार केला नाहीस. सिताई किर्तीला बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. पण किर्ती तिचे बोलणे थांबवत नाही. ती सिताईला म्हणते, तुला माहिती नाही. हा कृतघ्न मुलगा आहे. आशू मुलगा म्हणायच्या लायकीचा सुद्धा नाही. किर्तीचे हे बोलणे ऐकल्यानंतर सिताईचा संताप अनावर होतो आणि ती किर्तीला कानाखाली मारते. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “किर्तीचं बोलणं सीताईलाच असह्य होणार…”, अशी कॅप्शन दिली आहे.

शिवा मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना आवडला असल्याचे कमेंट्सवरून दिसत आहे. अनेकांनी किर्ती ज्या पद्धतीने वागते, त्यासाठी तिला कानाखाली बसायला पाहिजे होती, अशा आशयाच्या कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एक नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले, “वाह! खूप छान, हे पहिलेच केले असते तर”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हिला कानाखाली खाण्याची सवय झाली आहे आणि आम्हालाही हे बघण्याची सवय झाली आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अरे वाह!क्या बात है. अजून एक प्रेक्षकांकडून” अशा अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत.

“वाह!पहिल्यांदा सिताईचं कौतुक वाटलं, असंच पाहिजे या किर्तीला”, “अरे या किर्तीला सासरी पाठवा”, “पाहुण्यानी पाहुण्या सारखे राहवं, भावाचा संसारात लुडबुड नाही करावे “, अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आशूने जेव्हा शिवावरच प्रेम व्यक्त केले होते. तेव्हा सिताईने तिला सून मानण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशू शिवासह वेगळ्या ठिकाणी राहत होता. नोकरी मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अनेकदा त्याला त्याच्या घरच्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याने ती मदत नाकारली होती. मात्र, सिताई आजारी पडल्यानंतर शिवा व आशूने दवाखान्यात जात तिची विचारपूस केली होती, तिची काळजी घेतली होती. त्यावेळी सिताईने आशूला घरी येण्यासाठी सांगितले होते. आईच्या आरोग्यासाठी आशूने घरी येण्यास होकार दिला होता. तेव्हा सिताईने शिवालादेखील आशूबरोबर घरी येण्याची परवानगी दिली होती. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.