कोणत्याही मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. मालिकेत पुढे काय होणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते.याबरोबरच काही प्रश्नही पडलेले असतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा'(Shiva) मालिकेत सतत रंजक वळणे येताना दिसतात. नुकतीच शिवा व आशू पुन्हा एकदा त्यांच्या घरी आल्याचे पाहायला मिळाले. ते येताक्षणी किर्तीने आशू व शिवाबद्दल वाईट बोलले. ते असह्य होऊन सिताईने तिच्या कानाखाली मारल्याचे पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा किर्ती शिवाविरूद्ध कारस्थान करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की आशूच्या काकांची मुलगी म्हणजेच संपदा व रॉकी एकत्र आहेत. ते एकमेकांवर प्रेम करतात. त्यांना किर्ती एकत्र पाहते. ती त्या दोघांचा फोटो काढते. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, “शिवाबद्दल गैरसमज निर्माण करायला इतक्या लवकर उपाय मिळेल, असं वाटलं नव्हतं मला”, त्यानंतर तो फोटो तिच्या काकांना दाखवते. त्यावेळी ती म्हणते, “मी काहीतरी बोलायला जाणार आणि तुम्हाला ते पटणार नाही. ओळखलं ना हा मुलगा कोण आहे ते? तुम्हाला असं वाटतं की शिवाच्या विरोधात बोलते.” पुढे याच प्रोमोमध्ये पाहायला मिळते की किर्तीचा लक्ष्मण काका, किर्ती व तिचा नवरा काही गुंडांशी बोलत आहेत. किर्तीचा काका त्या गुंडांना रॉकीचा फोटो दाखवत त्यांना सांगतो, “त्याला अजिबात हात वैगेरे लावायचा नाहीये, त्याला फक्त धमकावायचं आहे”, काका निघून गेल्यावर किर्ती त्या गुंडांना सांगते की हे काम यांनीच करायला सांगितलं आहे, असं सांगायाचं.

शिवा मालिकेच्या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की ते गुंड रॉकीला खूप मारतात. संपदा त्यांना अडवायला जाते. पण,ते तिला थांबवतात. प्रोमोच्या शेवटी किर्ती म्हणते, “शिवा, आता तुझा गेम ओव्हर”, हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “कीर्ती तिच्या डावात यशस्वी होणार का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आशूच्या बहिणीला म्हणजेच किर्तीला शिवा आवडत नाही. ती आशूच्या आयुष्यातून कायमची निघून जावी, यासाठी ती सतत प्रयत्न करताना दिसते. अनेकदा ती मोठ मोठी कारस्थाने करताना दिसते. दिव्याच्या मदतीने तीने आशू व शिवा यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण, शेवटी सत्य सर्वांच्या समोर आले आणि शिवा-आशू एकत्र आले. संपदा ज्याच्या प्रेमात पडली आहे तो रॉकी शिवाच्या वस्तीतील असून तो शिवाच्या जवळचा आहे. संपदाच्या शिकवणीसाठी तो त्यांच्या घरी येत असे. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader