सुख-दु:ख, आनंद, चांगली-वाईट माणसं, सकारात्मकता-नकारात्मकता, कट-कारस्थानं करणारी जशी माणसाला खऱ्या आयुष्यात पाहायला मिळतात. तशीच पात्रे आपल्याला चित्रपट, मालिका, नाटक अशा माध्यमातून पाहायला मिळतात. नाट्यमय घडामोडी व रंजक वळणे यामुळे मालिका, चित्रपटांतील प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते. काही पात्रे प्रेक्षकांची लाडकी बनतात, तर काहींचा तिरस्कार केला जातो. पुढे काय होणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा असते. अशाच लाडक्या मालिकांपैकी एक ‘शिवा'(Shiva) ही मालिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या पुन्हा कारस्थान करणार…

शिवा मालिकेत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. दिव्या व किर्तीने शिवा व आशूमध्ये गैरसमज निर्माण केला होता. मात्र, दिव्याचा पती चंदनने त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला व अखेरीस त्याच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसले. आशूने सह्या केलेले घटस्फोटाचे पेपर फाडून टाकत शिवावरील त्याचे प्रेम व्यक्त केले. मात्र, सिताईने शिवाला तिची सून मानण्यास नकार दिला. हे पाहताच आशूनेदेखील त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेत दुसरीकडे संसार थाटला. तो आता स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत आहे. या सगळ्यात शिवा त्याला साथ देत आहे. मात्र, दिव्या अजूनही काही ना काही कारस्थान करीत असल्याचे दिसत आहे. शिवा मालिकेचा एक प्रोमो समोर आला असून आशूने पुन्हा त्याच्या घरी जावे, यासाठी दिव्या कारस्थान करताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दिव्या शिवा व आशूच्या नाश्त्याच्या डब्यात काहीतरी टाकते, हे करत असताना ती म्हणते की तू कसा परत जात नाहीस, हे मी बघते. राजकुमार आशुतोष देसाई तुला तुझ्या महालात जावंच लागेल. दिव्या शिवाकडे तो डबा देते. शिवा त्यातील नाश्ता आशूला खायला देते. त्यानंतर आशू आजारी पडतो. डॉक्टर फूड पॉयजनिंग झाल्याचे सांगतात. याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की आशूचे वडील म्हणजेच रामभाऊ शिवाकडे येतात व तिच्या हातात किल्या देत त्या त्यांच्या फ्लॅटच्या असल्याचे सांगतात. ते तिला म्हणतात की तुम्ही इथे असे राहताय हे मला काही पटत नाहीये. म्हणून तिथे फ्लॅटवर राहा. त्यानंतर आशू शिवाला म्हणतो की चल हे जे काही प्रकरण आहे, त्याचा सोक्षमोक्ष लावू.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की आशू व शिवा त्यांच्या घरी गेले आहेत. ते तिथे गेल्यानंतर सिताई व रामभाऊसह घरातील इतर सर्व मंडळी बाहेर येतात. आशू त्यांना ठामपणे सांगतो की माझी जी अवस्था आहे ना ती माझी मी ओडवून घेतली आहे, असं समजा. ती माझी निवड आहे. मला माझे निर्णय घेऊ द्या. असे म्हणत तो त्या किल्ल्या रामभाऊंकडे परत देतो. नंतर तो शिवाबरोबर परत जातो. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आशू त्याच्या निर्णयांवर ठाम”, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.