धाडसी, आत्मविश्वास असलेली, स्वत:च्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी प्रसंगी मारामारी करणारी, असे शिवा या तरुणीचे पात्र आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा'(Shiva) या मालिकेतील हे पात्र प्रेक्षकांचे सतत लक्ष वेधून घेताना दिसते. शिवाला कोणावरही झालेला अन्याय सहन होत नाही, गुंड जेव्हा गोरगरिबांना त्रास देतात, मुलींना छेडतात, त्यावेळी शिवा त्यांना त्यांच्याच भाषेत म्हणजेच मारामारी करीत उत्तर देते. तिची ही पद्धत मात्र तिच्या सासूला सिताईला आवडत नाही. तिच्या अशा स्वभावामुळे शिवाला तिचे सासर सोडावे लागले, असे तिच्या आईला वाटते. आता आशूचे दुसरे लग्न ठरल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आता शिवाची आई तिच्याकडून कधीही मारामारी न कऱण्याची शपथ घेणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शिवा तिच्या आई, आजी व बहिणीबरोबर; तर आशू त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मंदिरात आला आहे. त्यांची एकमेकांशी भेट होताच सिताई शिवाला आशूच्या लग्नाची पत्रिका देत म्हणते, “शिवा ही लग्नाची पत्रिका, लग्नाला सहकुटुंब या.”‌ त्यानंतर शिवाची आई तिला म्हणते, “हे जर आधी केलं असतंस ना, तर आशूच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात पडली नसती. तू देवी आईसमोर शपथ घे, तू पुन्हा मारामारी करणार नाहीस, कधी कोणाशी भांडणार नाहीस, शिवानी बोल”, असे वचन शिवाची आई तिच्याकडून घेत असल्याचे दिसत आहे.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Marathi actress Pooja Sawant started preparations to celebrate the first Makar Sankranti after marriage
Video: लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पूजा सावंत लागली तयारीला, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वेध…”
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic dance on chaar kadam Song
Video: ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा सुशांत सिंह राजपूत आणि अनुष्का शर्माच्या ‘या’ गाण्यावर रोमँटिक डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Kaumudi Walokar
Video : मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने शेअर केला लग्नातील अनसीन व्हिडीओ; म्हणाली….

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, मंदिराबाहेरच आशूची बहीण कीर्ती मोठ्याने तिच्या वडिलांना सांगते की भाऊ हे लोक चोर आहेत, यांनी माझी पर्स चोरली. त्यानंतर आशू व गुंडांमध्ये मारामारी होते. ते गुंड आशूला मारतात, भाऊंना धक्का देतात. मात्र, तितक्यात कोणीतरी गुंडांना मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाकडून तिची आई वचन मागत असते तेव्हा ही मारामारी सुरू आहे. आता शिवा तिच्या आईला कधीही न मारमारी करण्याचे वचन देणार की संकटात असलेल्या आशूच्या कुटुंबाला वाचवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “पुन्हा कधीही मारामारी न करण्याची शप्पथ शिवा घेईल का..?”, अशी कॅप्शन दिली आहे.

शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवाच्या सांगण्यावरून नेहाने आशूबरोबरच्या लग्नाला होकार दिला होता. दरम्यानच्या काळात आशूच्या मनात शिवाविषयी असलेल्या प्रेमाची त्याला जाणीव होईल, असे शिवाला वाटले होते. आता मात्र, आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला आहे.

हेही वाचा : ‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

आता आशू व नेहाचे लग्न होणार का, शिवा पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader