धाडसी, आत्मविश्वास असलेली, स्वत:च्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारी प्रसंगी मारामारी करणारी, असे शिवा या तरुणीचे पात्र आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा'(Shiva) या मालिकेतील हे पात्र प्रेक्षकांचे सतत लक्ष वेधून घेताना दिसते. शिवाला कोणावरही झालेला अन्याय सहन होत नाही, गुंड जेव्हा गोरगरिबांना त्रास देतात, मुलींना छेडतात, त्यावेळी शिवा त्यांना त्यांच्याच भाषेत म्हणजेच मारामारी करीत उत्तर देते. तिची ही पद्धत मात्र तिच्या सासूला सिताईला आवडत नाही. तिच्या अशा स्वभावामुळे शिवाला तिचे सासर सोडावे लागले, असे तिच्या आईला वाटते. आता आशूचे दुसरे लग्न ठरल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आता शिवाची आई तिच्याकडून कधीही मारामारी न कऱण्याची शपथ घेणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शिवा तिच्या आई, आजी व बहिणीबरोबर; तर आशू त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मंदिरात आला आहे. त्यांची एकमेकांशी भेट होताच सिताई शिवाला आशूच्या लग्नाची पत्रिका देत म्हणते, “शिवा ही लग्नाची पत्रिका, लग्नाला सहकुटुंब या.”‌ त्यानंतर शिवाची आई तिला म्हणते, “हे जर आधी केलं असतंस ना, तर आशूच्या लग्नाची पत्रिका आपल्या हातात पडली नसती. तू देवी आईसमोर शपथ घे, तू पुन्हा मारामारी करणार नाहीस, कधी कोणाशी भांडणार नाहीस, शिवानी बोल”, असे वचन शिवाची आई तिच्याकडून घेत असल्याचे दिसत आहे.

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, मंदिराबाहेरच आशूची बहीण कीर्ती मोठ्याने तिच्या वडिलांना सांगते की भाऊ हे लोक चोर आहेत, यांनी माझी पर्स चोरली. त्यानंतर आशू व गुंडांमध्ये मारामारी होते. ते गुंड आशूला मारतात, भाऊंना धक्का देतात. मात्र, तितक्यात कोणीतरी गुंडांना मारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाकडून तिची आई वचन मागत असते तेव्हा ही मारामारी सुरू आहे. आता शिवा तिच्या आईला कधीही न मारमारी करण्याचे वचन देणार की संकटात असलेल्या आशूच्या कुटुंबाला वाचवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, “पुन्हा कधीही मारामारी न करण्याची शप्पथ शिवा घेईल का..?”, अशी कॅप्शन दिली आहे.

शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवाच्या सांगण्यावरून नेहाने आशूबरोबरच्या लग्नाला होकार दिला होता. दरम्यानच्या काळात आशूच्या मनात शिवाविषयी असलेल्या प्रेमाची त्याला जाणीव होईल, असे शिवाला वाटले होते. आता मात्र, आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला आहे.

हेही वाचा : ‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

आता आशू व नेहाचे लग्न होणार का, शिवा पुढे काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva will get an invitation to aashus wedding aashus family in danger watch promo nsp