गेल्या सहा वर्षांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. टेन्शनवरची मात्रा असलेला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार आता घराघरात पोहोचले आहेत. प्रत्येक कलाकाराच्या विनोदी शैलीचा एक चाहता वर्ग तयार झाला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अशीच एक लोकप्रिय कलाकार म्हणजे शिवाली परब ( Shivali Parab ) . ‘कल्याणची चुलबुली’ या नावाने शिवालीला ओळखलं जातं. सध्या शिवालीचा भावंडांबरोबरचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शिवाली परब ( Shivali Parab ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचा संपर्कात असते. नुकताच तिने भावंडांबरोबरचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे; जो व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “रितेश भाऊ जरा आवाज वाढवा…”, जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा अपमान केल्यामुळे भडकल्या सुरेखा कुडची, म्हणाल्या, “मांजरेकर असते तर…”

शिवालीने बहीणीबरोबर केला प्रँक

शिवालीने ( Shivali Parab ) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने भावंडांबरोबर सध्या ट्रेंड होतं असलेलं Give Me My Money वर व्हिडीओ केला आहे. शिवालीच्या भावंडांनी एका बहिणीचा प्रँक केलेला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिवालीने लिहिलं आहे, “आम्ही आमचं रक्षाबंधन असे साजरे केले. हा व्हिडीओ तू आता सिंगल नाही म्हणून केला आहे. तू आता एक संसार सांभाळणारी बाई झाली आहेस म्हणून केला आहे. आपण खूप लवकर लवकर मोठे होतोय. आधी किती मस्ती करायचो, व्हिडीओ बनवायचो, बऱ्याच दिवसांनी ही अशी मस्ती या इन्स्टाग्राम रीलमुळे केली. ही आठवण नेहमी सोबत राहिल आणि तू आताही तशीच आहेस. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे सेजू ताई.”

हेही वाचा – “बदलापूरमध्ये सामान्य माणसांचा उद्रेक हा…”, हास्यजत्रेच्या दिग्दर्शकांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “भयंकर, क्लेशदायक…”

हेही वाचा – “माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

दरम्यान, शिवाली परबच्या ( Shivali Parab ) या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मस्त”, “अरे बिचारी”, “भारी”, “अरे रे बिचारी ताई…तिने कसं केलं”, “ही चिटिंग आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivali parab made funny video with brother and sister pps