‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. छोट्या पडद्यावरील हा विनोदी कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेत्री शिवाली परबला सुद्धा हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली. सोशल मीडियावर कायमच सक्रिय असणाऱ्या शिवालीच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवाली परबने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीची भेट मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्री गाजवणाऱ्या रितेश देशमुखशी झाली. या भेटीचा खास व्हिडीओ शिवालीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शिवालीसह हास्यजत्रा कार्यक्रमाचा परीक्षक प्रसाद ओक, तिचे सहकलाकार समीर चौघुले यांनी देखील रितेशची भेट घेतल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Manmohan Singh resume dr Manmohan Singh CV
Manmohan Singh Resume : प्राध्यापक, आरबीआय गव्हर्नर, अर्थमंत्री ते पंतप्रधान…; मनमोहन सिंग यांचा बायोडाटा होतोय व्हायरल, नेमकं त्यात लिहिलंय काय, वाचा
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ

हेही वाचा : ‘सॅम बहादूर’ Review: विकी कौशलचा अभिनय ही एकच जमेची बाजू, बाकी सगळा भ्रमनिरासच!

शिवली परब आधीपासून रितेश देशमुखची खूप मोठी चाहती आहे. भर कार्यक्रमात आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहिल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शिवालीने रितेशची विचारपूस केली त्यानंतर त्याला मिठी मारत छानसे फोटो काढले. रितेशची भेट झाल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “मानसी नाईकने तुझ्यावर आरोप केले, पण…”, ‘चंद्रमुखी’च्या वादावर चाहतीचा प्रश्न; अमृता खानविलकर म्हणाली…

“आपल्या कामाची पोचपावती आपल्या आवडत्या कलाकाराकडून मिळणं यापेक्षा वेगळा आनंद नाही.” असं कॅप्शन शिवालीने या व्हिडीओला दिलं आहे. या कॅप्शनवरुन रितेश देशमुखने संपूर्ण हास्यजत्रेच्या टीमचं भरभरून कौतुक केल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओला शिवालीने “वेड तुझं…” हे गाणं लावलं आहे.

हेही वाचा : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची ग्रँड ओपनिंग, पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…

दरम्यान, शिवालीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “अगं किती भारी वाटलं! अशीच प्रगती करत रहा खूप खूप शुभेच्छा बेटा” , “शिवाली ताई खूप छान” अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader