छोट्या पडद्यावरील चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून ओळख मिळवली आहे. तसेच या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना नवी ओळख दिली. या कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवताना दिसतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे आणि यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे शिवालीचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. शिवानीदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी, तिचे ग्लॅमरस फोटो, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या पडद्यामागील गमतीजमती चाहत्यांशी शेअर करीत असते. गेली अनेक महिने या कार्यक्रमात काम करीत असल्याने तिचे सगळ्यांशी खूप खास बॉण्डिंग तयार झाले आहे. आता शिवालीने ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी सेटवर कशा असतात हे सांगितले आहे.

आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय?

शिवाली म्हणाली, “सई ही खूप प्रेरणादायी आहे. तिच्याकडून मुलींनी खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उगाचच आम्ही तिला बोल्ड आणि बिनधास्त म्हणत नाही; ती खरेच तशीच आहे. ती विचारांनी खूप बोल्ड आहे आणि तिचे बरेच विचार हे मुलींनी घ्यावेत असे मला वाटते. ती खूप बिनधास्त आहे आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणून ती खूप चांगली आहे.”

हेही वाचा : “मला सलमान खानशी लग्न करायचंय…” प्राजक्ता माळीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली…

तर प्राजक्ता माळीबद्दल बोलताना ती म्हणाली, “प्राजूताई खूपच गोड आहे. ती अत्यंत नम्र आहे. रात्री शूटिंगनंतर सगळे दमलेले असतात तर तिच्याकडे पाहिले की आम्हाला हुरूप येतो. जर काही चुकले तर ती खूप चांगले सांभाळून घेते.” शिवालीचे हे बोलणे आता खूप चर्चेत आले आहे.

Story img Loader