एका बाजूला ‘झी मराठी’ वाहिनीवर पाच नव्या मालिका सुरू होणार आहेत. तर आता दुसऱ्या बाजूला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबरोबर आणखी एका मालिकेची घोषणा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने केली आहे. या मालिकेत लाडकी शितली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर व लाडका पश्या म्हणजे अभिनेता आकाश नलावडे पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काल, ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “तयार व्हा आपल्या स्टार प्रवाह परिवारात दोन कमाल सदस्यांच्या स्वागतासाठी” असं त्यावर लिहिण्यात आलं होतं. या सदस्याचे चेहरे लपवण्यात आले होते. पण या पोस्टवरून या दोन चेहऱ्यांपैकी एक ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अभिनेता आकाश नलावडे असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला होता. नेटकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून आकाश आता शिवानी बावकरसह पाहायला मिळणार आहे.

zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Chhava controversy
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘छावा’ चित्रपटातली ती दृश्यं का कापली जाणार?
Testing of water supplied through tankers wells borewells due to GBS disease pune
पिंपरी: ‘जीबीएस’चा धोका वाढला! टँकर, विहिरी, बोअरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…

हेही वाचा – बॉलीवूड सुपरस्टारच्या कुटुंबियांना भेटली रिंकू राजगुरू, फोटो शेअर करत म्हणाली, “बऱ्याच…”

‘साधी माणसं’ असं नव्या मालिकेचं आहे. या मालिकेत शिवानी मीराच्या भूमिकेत तर आकाश सत्याच्या भूमिकेत झळकणार आहे. एका शहरात राहणारे, पण दोन विभिन्न स्वभावाचे मीरा आणि सत्या यांच्याबरोबर नियती काय करते? हे नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘साधी माणसं’ या मालिकेतून पहिल्यांदाच शिवानी व आकाशाची नवी जोडी झळकणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘जाऊ बाई गावात’ची विजेती रमशा फारुकी झळकली होती ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत, पाहा व्हिडीओ

‘साधी माणसं’ या नव्या मालिकेच्या जबरदस्त प्रोमोवर कलाकार मंडळींसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूजा बिरारी, नंदिता पाटकर, साक्षी गांधी, अक्षर कोठारी, चेतन वडनेरे, अक्षया गुरव अशा अनेक कलाकारांनी शिवानी व आकाशला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कलाकार जुने आहेत, पण काही बोला प्रोमो मात्र लय जबरदस्त आहे’, ‘खूप उत्सुक आहोत’, ‘अभिनंदन’, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोवर दिल्या आहेत.

Story img Loader