Happy Birthday Shivani Rangole : ‘बन मस्का’, ‘सांग तू आहेस का’, ‘आम्ही दोघी’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकांमधून अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारत आहे. बालवयातच अभिनय क्षेत्राकडे वळणारी शिवानी आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी रांगोळेने वैयक्तिक आयुष्यात अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांचा विवाहसोहळा ३ मे २०२२ रोजी पुण्यात पार पडला होता. हे दोघंही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आधी मैत्री, पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन शिवानी-विराजस खऱ्या आयुष्यात एकत्र आले. विराजस कुलकर्णी हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक आहे. त्यामुळे सुनेच्या ( Shivani Rangole ) वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींनी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “ठाणे महानगरपालिका झोपलीये…”, कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर संतापला! म्हणाला, “दारूच्या बाटल्या, तंबाखू…”

शिवानी रांगोळेसाठी सासूबाईंची खास पोस्ट

लग्नाआधी अनेक वर्षे शिवानी आणि विराजस यांची खूप चांगली मैत्री असल्याने सासरच्या घरी अभिनेत्रीचं सर्वांशी एक सुंदर बॉण्डिंग तयार झालं होतं. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. त्या आपल्या सुनेचा मुलीप्रमाणे सांभाळ करतात तर, शिवानी सुद्धा सासूबाईंना प्रेमाने ‘ताई’ अशी हाक मारते. या दोघींच्या बॉण्डिंगची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते.

सुनेच्या ( Shivani Rangole ) वाढदिवसानिमित्त मृणाल यांनी फेसबुकवर शिवानीचा सुंदर असा फोटो शेअर केला आहे. “आज आपल्या शिवानीचा वाढदिवस ना!! काहीतरी गंमत काहीतरी जंमत करायला हवी” असं कॅप्शन त्यांनी या फोटोवर दिलं आहे. मृणाल कुलकर्णींच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह, जवळच्या मित्रमंडळींनी शिवानीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Zee Marathi Awards : यंदाची सर्वोत्कृष्ट मालिका ठरली ‘पारू’! तर, लोकप्रिय नायक-नायिका आहेत…; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

हेही वाचा : Video : “मैं जोरू का गुलाम…”, गोविंदाच्या सुपरहिट गाण्यावर अक्षरा-अधिपतीचा जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “विषय हार्ड…”

दरम्यान, शिवानी रांगोळेच्या ( Shivani Rangole ) मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यामध्ये तिच्यासह कविता लाड-मेढेकर, हृषिकेश शेलार, स्वप्नील राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani rangole birthday mother in law mrinal kulkarni writes special post for her sva 00