Shivani Rangole And Virajas Kulkarni : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी रांगोळेला घराघरांत अक्षरा आणि मास्तरीण बाई या दोन नावांनी ओळखलं जातं. या मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. अक्षरा-अधिपतीची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र, सध्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढत शिवानी आपल्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात पोहोचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेक्षकांच्या या लाडक्या मास्तरीण बाईंनी २०२२ मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. सध्या संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीय गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. विराजसचा वाढदिवस चार वर्षांनी ( २९ फेब्रुवारी ) एकदाच येतो. त्यामुळे दरवर्षी अभिनेत्याचा वाढदिवस त्याचे कुटुंबीय २८ फेब्रुवारी किंवा १ मार्चला साजरा करतात. यंदा विराजसच्या वाढदिवसानिमित्त शिवानी रांगोळे, तिच्या सासूबाई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, विराजस, त्याचे बाबा असे सगळेजण गोवा फिरण्यासाठी गेले आहेत.

मास्तरीण बाईंनी गोव्यातील सुंदर अशा रिसॉर्टमध्ये नवऱ्याचा वाढदिवस केला. ‘गोवन डायरिज’ असं कॅप्शन देत शिवानी रांगोळने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विराजसच्या वाढदिवसाचा केक, गोवन संस्कृती, गोव्याचे पदार्थ, कुलकर्णी कुटुंबाचा एकत्र फोटो याची झलक पाहायला मिळत आहे.

शिवानी रांगोळे विराजसला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिते, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विराजस. गंभीर परिस्थितीतही तुला नेहमीच काही ना काही मजेशीर सुचत राहूदेत. आमचा फ्रिज नेहमीच व्हॅनिला आईस्क्रीमने भरलेला राहो. आयुष्यभर तू असेच नवनवीन प्रोजेक्ट बनवत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याबरोबर कायम असाच राहा.”

शिवानीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे. २०२२ मध्ये ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्यातलं बॉण्डिंग आणि त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच खूप आवडते. सध्या अभिनेत्री ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, विराजसने ‘वरवरचे वधूवर’ या नाटकाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे.