‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. कालच या मालिकेमध्ये अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा सप्ताह सुरु झाला. तर आता त्या निमित्ताने अक्षराने अधिपतीसाठी एक खास उखाणा घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अभिनेत्री शिवानी रांगोळे यामध्ये अक्षराची भूमिका साकारत आहे तर अभिनेता ऋषिकेश शेलार यात अधिपतीची भूमिका साकारत आहे. मालिकेतील त्यांच्या साखरपुड्यानिमित्त त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

आणखी वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

गेले अनेक दिवस अक्षरा आणि अधिपती यांच्या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा आहे. साखरपुड्यासाठी अधिपती आणि अक्षरा छान तयार झाले आहेत. तर या साखरपुड्याच्या सिक्वेन्सच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अक्षराने अधिपतीसाठी उखाणा घेतला. उखाणा घेत शिवानी म्हणाली, “मित्रही आहेत, आता होणारे पती आहेत अधिपती, या लग्नामुळे जुळली गेली काही अनोखी नाती.”

हेही वाचा : “फक्त मालिकेतल्या सासू व नवऱ्यालाच…” मृणाल कुलकर्णींचा सून शिवानी रांगोळेला मजेशीर सल्ला

अक्षराने अधिपतीसाठी घेतलेला हा उखाणा आता त्यांच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तरी या मालिकेच्या आगामी भागांबद्दल सर्वजण उत्सुकता व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani rangole said special ukhana for his onscreen husband adhipati from tula shikvin changlach dhada serial rnv