‘झी मराठी’ वाहिनीवर गेली दीड वर्षे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्षरा – अधिपतीची जोडी घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. ‘सांग तू आहेस का’, ‘बन मस्का’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘आम्ही दोघी’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये शिवानीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी मालिकांसह रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारी ही गुणी अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची सून आहे. ३ मे २०२२ रोजी शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. विराजस व शिवानी लग्नाआधी कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे शिवानीची पहिल्यापासूनच सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्याशी ओळख होती.

हेही वाचा : “नवरा फक्त नाचताना असतो वाटतं…”, म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “आवाज किती तुमचा…”

मृणाल कुलकर्णी व शिवानी रांगोळे यांच्यामध्ये सासू-सुनेपेक्षा मैत्रीचं नातं आहे. विशेष म्हणजे शिवानी तिच्या सासूबाईंना सासूबाई किंवा आई या नावाने नव्हे तर ‘ताई’ या नावाने हाक मारते. याबाबत अनेक मुलाखतींमध्ये अभिनेत्रीने यापूर्वी खुलासा केला आहे. याशिवाय शिवानीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टचं कॅप्शन वाचून देखील नेटकऱ्यांना या दोघींच्या सुंदर नात्याचा उलगडा झाला असेल.

शिवानीने तिच्या सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंमध्ये या सासू-सुनेचं सुंदर असं बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. अगदी नेटकऱ्यांनी देखील या दोघींच्या नात्यावर कौतुकाचा वर्षव केला आहे. शिवानीने या फोटोला “लव्ह यू ताई…” असं कॅप्शन दिलं आहे. यावरून ती मृणाल कुलकर्णींना ताई अशी हाक मारते हे स्पष्ट होतं.

हेही वाचा : ठरलं तर मग : आधी जीवघेणा हल्ला, नंतर किल्लेदारांच्या घरातून प्रिया झाली गायब; मालिकेत पुढे काय घडणार?

शिवानीचा सासूबाईंबरोबरचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “तुम्ही दोघी माझ्या आवडत्या अभिनेत्री आहात”,
“लकी सासू…सुना”, “सुंदर नातं आहे दोघींमध्ये”, “टचवूड पण दोघीपण खूपच सुंदर राजबिंड्या दिसता…खूप प्रेम”, “सोनपरी…”, “सख्ख्या बहिणीच वाटता” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम करताना मृणाल कुलकर्णींना सेटवर शिवानी आधीपासूनच ‘ताई’ अशी हाक मारायची. त्या सेटवर शिवानी सोडून इतर लोक सुद्धा त्यांना ताई म्हणून हाक मारायचे. नाटकादरम्यान काम करतानाही शिवानी त्यांना ताईच म्हणायची. “हेच अंगवळणी पडल्यामुळे लग्नानंतर सुद्धा मला ताईच म्हण” असं मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीला सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani rangole shares photo with mother in law actress mrinal kulkarni netizens loved their bonding sva 00