अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. विराजस आणि शिवानीचा प्रेमविवाह आहे. नुकतंच एका मुलाखतीत शिवानीने विराजसबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने आजीच्या आठवणीत बनवला खास पदार्थ; म्हणाली, “तिच्या हातचं…”

शिवानी म्हणाली, “जेव्हा मला विराजसने लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा तो एक अंगठी घेऊन आला होता. आणि ही अंगठी खूप मोठी होती. कारण तो मला अंगठीच माप विचारू शकत नव्हता. नाहीतर मला कळालं असत की तो मला प्रपोज करणार आहे. त्याने जी अंगठी आणली होती ती इतकी मोठी होती की मी हाथ खाली केला की ती पडायची. आणि मला अंगठी तर घालायची होती. त्यामुळे मी ती रिंग हातात धरून सगळीकडे फिरायचे. अनेक दिवस असंच चाललं होतं. शेवटी त्याने माझ्या मापाची अंगठी करायला दिली. माझं माप बघून अंगठी करणारे म्हणाले की हा लहान मुलांच्या बोटाचं माप आहे. त्यांनी खूप वेळ घेतला आणि शेवटी माझ्या मापाची अंगठी बनली.”

शिवानीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अक्षरा असं तिच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. सध्या या मालिकेची आणि तिच्या भूमिकेची खूप चर्चा आहे. मालिकांबरोबर शिवानीने चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या सुभेदार या मराठी चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.