Shivani Rangole : मराठी नाटक व मालिकांमधून अभिनेत्री शिवानी रांगोळे घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे तिला घराघरांत मास्तरीण बाई म्हणून ओळखलं जातं. या मालिकेत तिने अक्षरा सूर्यवंशी हे पात्र साकारलं आहे. पण, तिला अधिपती प्रेमाने ‘मास्तरीण बाई’ म्हणून हाक मारत असतो. मालिका सुरू झाल्यापासून अक्षराला आता तिचे चाहते जागोजागी याच ऑनस्क्रीन नावामुळे ओळखतात. विमान प्रवासादरम्यान सुद्धा अभिनेत्रीला असाच काहीसा अनुभव आला. याबद्दलची पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शिवानी रांगोळने ( Shivani Rangole ) ‘सांग तू आहेस का’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघे’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना शिवानीच्या भोवती चाहत्यांची नेहमीच गर्दी होते. नुकताच विमान प्रवास करताना अभिनेत्रीला पाहून विमानातील हवाईसुंदरीने तिच्यासाठी छानसं पत्र लिहिल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : Video : ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड झाला सावंतवाडीचा जावई, लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; म्हणाला, “प्रपोज नाही थेट लग्नाची घातलेली मागणी…”

हवाईसुंदरी शिवानीसाठी लिहिते, “प्रिय मास्तरीणबाई विमानात तुमचं स्वागत करताना मला प्रचंड आनंद होत आहे. माझे पालक तुमचे खूप मोठे चाहते आहेत. तुमच्याबरोबर प्रवास करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा नक्कीच भेट होईल.” तिने दिलेल्या पत्राचा आणि गिफ्टचा फोटो शेअर करत शिवानी रांगोळने कृतज्ञता व्यक्त करत खास पोस्ट शेअर केली आहे.

शिवानी रांगोळेची पोस्ट

शिवानी ( Shivani Rangole ) लिहिते, “कितीही वेळा प्रवास केला तरी मुळात मी nervous flyer आहे! अशावेळी एका परक्या देशात असताना जेव्हा आपल्याला ‘मास्तरीणबाई’ म्हणून हाक मारून, आपली काळजी घेतली जाते तेव्हा खूप छान वाटतं! आपलं काम, जे आपण आयुष्यभरासाठी निवडलं आहे, त्यातून पैशांबरोबर आनंद आणि समाधान मिळणं हे खूप दुर्मिळ असतं. आणि ते आपल्या बाबतीत खरं आहे याचा वारंवार आनंद होतो! माझा प्रवास सुखाचा करण्यासाठी सानिका व विमान कंपनीचे आभार”

हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका संपणार! ४ वर्षे गाजवलं अधिराज्य, शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडीओ आला समोर

दरम्यान, शिवानी रांगोळेच्या ( Shivani Rangole ) या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी देखील कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. याशिवाय या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Story img Loader