‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच या मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा विवाहसोहळा पार पडला. नवीन लग्न झाल्यावर आता अक्षरा-अधिपती जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायला गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मराठी चित्रपटाचा क्लायमॅक्स ‘जवान’ने केला कॉपी? महेश मांजरेकरांनी केला दावा, म्हणाले, “त्यांनी सेम टू सेम…”

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपती जेजुरी गडावर दर्शनाला जातानाचा सीक्वेन्स सुरू आहे. यामध्ये अधिपती बायकोला घेऊन जेजुरी गड चढणार असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अक्षरा दर्शन घेताना मंदिर परिसरात लोटांगण घालताना दिसत आहे. मालिकेतील या सीनवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “कोकण जगात सुंदर आहे, पण…”, कोकणाच्या विकासाबाबत महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, “रस्त्यावरचे खड्डे…”

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील उच्चशिक्षित शिक्षिका असते. तर, दुसरीकडे अधिपती हा कमी शिकलेला पण, गर्भश्रीमंत असतो. त्यामुळे अधिपतीच्या घरचे सारखे अक्षराचा छळ कसा करता येईल यासाठी नवनवे डाव रचत असतात. याच पार्श्वभूमीवर मालिकेच्या नवा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागले आहे. एका युजरने या प्रोमोवर, “ही शिक्षिका म्हणवते स्वतःला…स्वतः च अन्याय सहन करते आहे विद्यार्थ्यांना ही अन्यायाविरूद्ध कसे लढायचे?” अशी कमेंट केली आहे. तर, अन्य काही युजर्सनी “लेखकाने आम्हालाच विनोदी धडा शिकवला आहे”, “तुम्ही पैशासाठी काहीही नका रे दाखवू”, “मूर्खपणाचा अतिरेक”, “मालिकांच्या लेखकांना आवरा रे”, “हिचा बिनडोक अधिपती कुठे गेला” अशा प्रतिक्रिया देत मालिकेला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा : Video: …अन् क्रांती रेडकरच्या लेकीने पक्ष्यांसाठी कापले स्वतःचे केस; अभिनेत्रीने सांगितली जुळ्या मुलींची करामत

मालिकेला केलं ट्रोल

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार, कविता लाड, स्वप्नील राजशेखर या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani rangole tula shikvin changlach dhada marathi serial troll because of recent track sva 00