‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री शिवानी रांगोळे सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. ही मालिका गेली वर्षभर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याशिवाय अक्षरा-अधिपतीच्या जोडीला घराघरांत पसंती मिळत आहे. या मालिकेतील मुख्य नायक अधिपती अक्षराला नेहमी मास्तरीणबाई अशी हाक मारतो. त्यामुळे आता शिवानीला सर्वत्र मास्तरीणबाई अशी नवीन ओळख देखील मिळाली आहे.

शिवानी रांगोळेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आज अभिनेत्रीच्या वडिलांचा वाढदिवस असल्याने तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Aishwarya Narkar Birthday
५० वर्षांच्या झाल्या ऐश्वर्या नारकर! ‘असा’ साजरा केला वाढदिवस; व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक, म्हणाल्या…
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : स्वप्नपूर्ती! ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अदिती द्रविडने मुंबईत घेतलं स्वत:चं घर; फोटो शेअर करत म्हणाली, “फायनली…”

शिवानी रांगोळेने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांबरोबर खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शिवानी-विराजसच्या लग्नातील आहे. यात तिचे वडील लाडक्या लेकीच्या डोक्यावर अक्षता टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गोड फोटोला कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा! पप्पा तुम्ही एवढी वर्षे मला प्रत्येक गोष्टी पाठिंबा दिलात यासाठी खूप खूप थँक्यू! तुम्ही जसे आहात तसेच कायम राहा.”

हेही वाचा : Video : ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’, माधुरी दीक्षितसह अंकिता लोखंडेचा जबरदस्त डान्स; म्हणाली, “मॅम मी तुमची…”

शिवानीने शेअर केलेल्या फोटोवर तिच्या काही चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मास्तरीणबाईंनी संपूर्ण कुटुंबाचा एकत्रित फोटो शेअर केला होता. यामध्ये शिवानीचे आई-बाबा, तिचा पती अभिनेता विराजस आणि त्याचे आई-बाबा फोटोसाठी एकत्र पोज देताना दिसले. आता वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शिवानीने लग्नातील मंगलाष्टकादरम्यानचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : या आठवड्यात OTT वर आलेत जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वीकेंड मनोरंजक करण्यासाठी वाचा कलाकृतींची यादी

दरम्यान, शिवानी रांगोळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत ती अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारत आहे. यापूर्वी शिवानीने ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ चित्रपट अभिनेत्री झळकली होती.

Story img Loader