Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding First Photo : छोट्या पडद्यावर सक्रिय असणारे अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळत आहे. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत होते. ग्रहमख, हळद, मेहंदी, संगीत सोहळा असे लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर आता शिवानी आणि अंबरने साता जन्माची गाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नातील पहिला फोटो चाहत्यांसमोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी व अंबर यांनी लग्नात पारंपरिक लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने हिरव्या रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी, त्यावर लाल रंगाचा शेला, हातात हिरवा चुडा, भरजरी दागिने, नाकात नथ असा पारंपरिक लूक लग्नात केला होता. तर, अंबरच्या मराठमोळ्या लूकने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांच्या लग्नातील अनेक इनसाइड व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवानी आणि अंबर यांचा साखरपुडा गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडला होता. यानंतर शिवानी आणि अंबरसाठी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने खास केळवण आयोजित केलं होतं. याशिवाय संगीत सोहळ्यात सुद्धा या जोडप्याने दाक्षिणात्य गाण्यावर तुफान एनर्जीसह डान्स केल्याचा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला होता. लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

दरम्यान, शिवानी आणि अंबर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे शिवानीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने संजीवनी बांदल- ढालेपाटील हे पात्र साकारलं होतं. यानंतर अभिनेत्री सुबोध भावेबरोबर ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती.

शिवानी सोनार व अंबर गणपुळे यांचा विवाहसोहळा ( shivani sonar and ambar ganpule wedding photo)

तर, अभिनेता अंबर गणपुळे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आला. याशिवाय त्याने ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘दुर्वा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani sonar and ambar ganpule wedding updates star couple tie knot inside photo viral sva 00