Shivani Sonar Pre Wedding Rituals : अभिनेत्री शिवानी सोनार ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने साकारलेल्या संजू या पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवानीने वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनेता अंबर गणपुळेशी साखरपुडा केला. आता येत्या काही दिवसांत शिवानी आणि अंबर बोहल्यावर चढणार आहेत. सध्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी आणि अंबरच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचं केळवण पार पडलं होतं. याचे सुंदर फोटो शिवानीने सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने सुद्धा अंबर-शिवानीचं केळवण केलं होतं. शिवानी व अंबर यांच्या केळवणाला, रेश्मा शिंदे, विदिषा म्हसकर, शाल्मली टोळ्ये, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, तनिषा विषे, पूर्णिमा तळवलकर असे मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आलेल्या नव्या मुक्ताबद्दल सावनी काय म्हणाली? दोघींनी यापूर्वी ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम

थाटामाटात केळवण पार पडल्यावर आता नुकताच अभिनेत्रीच्या घरी ‘अष्टवर’ विधी पार पडला होता. लग्नाआधीच्या विधींसाठी नवी नवरी शिवानी सुंदर अशी नटली होती. गुलाबी रंगाची साडी, डोक्याला मुंडावळ्या, हातात बांगड्या या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय गोड दिसत होती. अष्टवर विधीनंतर अभिनेत्रीने आपल्या कुटुंबीयांसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

“नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली” या गाण्यावर शिवानीचे सगळे कुटुंबीय एकत्र थिरकले. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने याला “उत्साही कार्यकर्ते, #teambride” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर अंबरने सुद्धा ‘Eeewwwwww’ अशी कमेंट केली आहे. आता शिवानी आणि अंबरच्या विवाहसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Shivani Sonar Pre Wedding Rituals

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’! अभिनेत्रीचं कौतुक करत म्हणाले, “इंदिरा गांधी यांची भूमिका…”

हेही वाचा : इब्राहिम नव्हे तर ८ वर्षीय तैमूरने वडिलांना रुग्णालयात नेलं; सैफ अली खानच्या डॉक्टरांची माहिती, म्हणाले…

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’, ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी ( Shivani Sonar ) ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ अशा मालिकांमध्ये झळकली आहे. आता लवकरच शिवानी आणि अंबर यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani sonar pre wedding rituals shares dance video with relatives watch now sva 00